देशविदेश

६ महिन्यापासून फरार असलेला काँग्रेसच्या आमदार पुत्राला बलात्कार प्रकरणी अटक

 

मध्यप्रदेश | मध्यप्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वी काँग्रेसशी संलग्न असलेल्या एका व्यक्तीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेतील आरोपी असलेल्या आमदार पुत्राने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता. याप्रकरणी पीडित तरुणीने काँग्रेस आमदार पुत्राविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र गुना दाखल होताच त्या आमदार पुत्राने पळ काढला होता.

अखेर त्या आमदार पुत्राला अटक निर्णय आलेली असून करण मोरवाल असे अटक केलेल्या काँग्रेस आमदार पुत्राचे नाव आहे. तो बडनगरचे काँग्रेस आमदार मुरली मोरवाल यांचा मुलगा आहे. आरोपी करणवर पोलिसांनी बलात्कारासह अन्य गंभीर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे तो गेल्या काही महिन्यांपासून फरार होता. या घटनेमुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण बरंच तापले होते.

मात्र अखेर अनेक दिवसांच्या पोलिसांच्या कारवाईला यश आले असूनआरोपी करण मोरवाल याला जेरबंद करण्यात आले आहे. आमदार मुरली मोरवाल यांचा मुलगा करण याने लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला होता. बलात्कार केल्यानंतर आरोपी करणने पीडितेशी लग्न करण्यास नकार दिला. पीडित मुलगी इंदूरची रहिवासी आहे.

Back to top button