मुंबई

वाढदिवस अर्थातच आपल्या आयुष्यातील कमी होणारं एक वर्ष

आज सर्वजण आपला वाढदिवस मोठया थाटामाटाने साजरा करतात. कोणी घरी नातेवाईकांना बोलून सेलिब्रेशन करतात तर कोणी आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर स्वतःच्या प्रकटदिनाचे स्वागत करतात. मात्र अनेकदा असा प्रश्न सुद्धा मनात उपस्थित होतो की, मी माझ्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करतोय की आयुष्यातील एक वर्ष कमी झाले याचा आनंद साजरा करतोय.

आज पृथ्वीवर दिसणारी प्रत्येक वस्तू ही नाशिवंत आहे तसे माझे शरीर सुद्धा नाशिवंत आहे याची जाणीव मला अनेकदा आजारी पडल्यावर झालेली आहे. खरं पहिले तर मनुष्याच्या आयुष्याची सुरवात आईच्या गर्भातून बाहेर पडल्यावर सुरवात होऊन त्याचा अंत स्मशानात केव्हा होतो हे समजून सुद्धा येत नाही.

तसे पहिले तर भारतात १ जूनला केकच्या दुकानात केकची मोठी मागणी असते कारण जुन्या काळात ज्यांना जन्मतारीख माहित नव्हती यांची सर्वांची राष्ट्रीय जन्मतारीख १ जून म्हणून घोषित करण्यात आली. लहानपणी असताना आईवडिलांनी प्रेमानं जन्मदिन साजरा केला मात्र हापचड्डी सोडून फूल पॅन्ट घालायला सुरवात केल्यानंतर भांडून आईकडून पैसे घेऊन मित्र-मैत्रिणीबरोबर वाढदिवस बापाच्या पैशावर साजरा केला.

पण आज कळायला लागल्यावर, वाचायला लागल्यावर निव्वळ वाढदिवस म्हणजे फक्त पैसे वायफळ घालवण्याचा जरिया आहे याची जाणीव झाली. तसेच मला कोणाला दुखवायाचे नाही पण आज वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या संकल्पनेचा उगम कोठून झाला याचा विचार करताना मनात घोळत असलेले विचार मांडले. बाकी जागा आणि जगू द्या.. कारण उद्याचा दिवस आज कोणी पहिला आहे…!

Back to top button