संपादकीय

क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ‘शिवतीर्थ’वर भेट

 

मुंबई | क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने राज ठाकरे यांची त्यांच्या नव्या घरी अर्थात शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली. या भेटीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. दिवाळीला पाडव्याचा शुभ मुहूर्त साधून राज ठाकरे यांनी आपल्या नवीन घरात प्रवेश केला. कृष्णकुंजच्या शेजारीच राज ठाकरेंचे नवे निवासस्थान बांधण्यात आले आहे. राज ठाकरेंचे नवे निवासस्थान सर्व सोईसुविधांनी युक्त आहे.

तसेच येथेच मनसेचे मुख्य कार्यालय असेल. त्याबरोबरच एक ग्रंथालयही येथे असेल. इमारतीच्या वरच्या मजल्यांवर ठाकरे कुटुंबीयांची राहण्याची व्यवस्था असेल. राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांचे मित्रत्व जगजाहीर आहे. राज ठाकरे यांच्या नवीन घरी सचिन तेंडुलकर पोहोचला. सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा नेमका उद्देश काय, याबद्दल माहिती मिळालेली नसली, तरी सचिनने राज यांच्या नव्या घराला सदिच्छा भेट दिल्याचे सांगितले जात आहे.

सचिन तेंडुलकरने राज ठाकरे यांची शिवतीर्थवर जाऊन भेट घेतल्यावर सचिनचा एक फोटो व्हायरल झाला आहे. एका पेंटिंगच्या शेजारी उभे राहून त्याने हा फोटो काढला आहे. हा फोटो राज ठाकरे यांच्या घरातील असल्याचं सांगितले जात आहे. तसेच नव्या घराच्या गॅलरीत राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर हे दोघेही उभे असताना अनेकांनी त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढले आहेत .

Back to top button