मुंबई

शाहरुख मला तुझा अभिमान वाटतो, उर्मिला मातोंडकर हिने केले कौतुक

 

मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची आज सकाळी अखेर २७ दिवसांनी आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली. शाहरुख खानाच्या अनेक चाहत्यांनी मन्नत बंगल्याबाहेर एकच गर्दी केली होती. तसेच चित्रपट सृष्ठीतीलं अनेकांनी त्याला पाठिंबा दर्शवला होता. त्यातच आता आर्यनच्या सुटकेनंतर अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकरने शाहरुखच्या समर्थनार्थ एक खास टि्वट केलं आहे.

ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानला गुरुवारी संध्याकाळी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. आज त्याची सुटका झाली. “कुठल्याही व्यक्तीच खर चारित्र्य कठीण काळात दिसतं. या कठीण काळात जी सभ्यता, परिपक्वता आणि शक्ती तू दाखवलीस, त्यामुळे तू माझा सहकारी आहेस, याचा अभिमान वाटतो. तू सर्वोत्तम राहशील” असं टि्वट उर्मिलाने केलं आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आता राजकारणात आहे. त्यामुळे ती नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात करणारी उर्मिला आता शिवसेनेमध्ये आहे. काँग्रेसच्या तिकिटावर तिने गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. पण तिचा पराभव झाला होता. सध्या शिवसेना पक्षावर टीका करणाऱ्या विरोधकांना त्या सडेतोड उत्तर देताना दिसून येत आहेत.

Back to top button