बीड

आधी, व्याधी ,उपाधी मिटवण्यासाठी असावी एकाग्रतेतून लागलेली अंतकरणाची समाधी

आधी, व्याधी ,उपाधी मिटवण्यासाठी असावी एकाग्रतेतून लागलेली अंतकरणाची समाधी

महाराष्ट्र प्रवर्तनी साध्वी पूज्य प्रतिभा कवरजी म.सा.

बीड (प्रतिनिधी):   जैन धर्म आराधनेतील प्रवचन मालेत आज चौथे पुष्प गुंफले गेले .त्यात सर्वप्रथम पूज्य श्री समिती महाराज साहेबांनी आपले विचार मांडले. पुरुषार्थाने केले कार्य तर  ते आत्मउद्धाराला साधले  साह्यभूत  होते हे सांगताना त्यांनी कबीराचे उदाहरण दिले .त्याकाळी अंत्ययात्रेला जाताना  व अंत्ययात्रेत समाविष्ट होताना दिवा बाळगला जात असे व हा दिवा अंत्ययात्रे होईपर्यंत तेवत असे .व नंतर मात्र तो विजत असे. मात्र कबीराच्या डोईवरील दिवा हा कायम प्रज्वलित राहत असे. कारण लोकांची समज अशी होती की मृत्यू हाच अंतिम टप्पा आहे. त्यानंतर आपण त्याला विसरून आपले पुढचे कार्य करावे. आणि त्या मृत्यूला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी डोईवर दिवा ठेवला जात असे .या विपरीत कबीराचा दिवा कायम तेवतअसे कारण मृत्यू हा आत्म्याचा शेवट नाही .तर आत्मा हा नाशवंत आसून  तो सजग आहे या भावनेतून तो दिवा प्रज्वलित ठेवीत आणि तसा उपदेश करीत या आत्म्याला मुक्तता मिळवायची असेल तर त्याला समाधीच्या मार्गातून हा मुक्त होऊ शकतो. यासाठी पुरुषार्थ असावा लागतो या पुरुषार्थातून पुनवानी उपलब्ध होते ही पुनवाणी साधनेतून समाधीला जाते .व आत्म्याला मोक्षत्व प्राप्त होते यासाठी काही तत्त्वाचा त्यांनी आपल्या प्रवचनातून  उदबोध
दिला. ते असे ळ१)आपणास जे कार्य करावे वाटते ते करत राहावे त्याची फलश्रुती परमेश्वराकडून मिळते २)त्या करावयाच्या कार्याची काळजी आपण न करावी त्याची चिंता नसावी तीही परमेश्वराकडून पूर्णत्वास जाते. ३)जे आपणाकडे आहे त्यालाच पसंत करावे. त्याला इतरत्र शोधण्याचा प्रयत्न नसावा
४)इतरांना दुःखातही सुख देण्याचा प्रयत्न करावा आपण कधी दुःखात न राहता सदैव आनंदात वापरावे असे त्यांनी उदाहरणातून पटवून दिले तर मुख्य प्रवचनात साध्वी प्रतिभाजी म्हणाल्या या सृष्टीवर अवतरणारा प्रत्येक मानव साडेतीन कोटी रोगापैकी कोणत्यातरी रोगाला बळी पडतो आयुर्वेदाने हेच प्रतीत केले आहे प्रत्येक शारीरिक रोगाचे मूळ हे कफ, वात ,पित्तावरच अवलंबून असते मात्र मानवाच्या आयुष्याला लागलेली पीडा ही आदी ,व्याधी, उत्पादि तून मोडली जाते जी तन-मन धनाला व्यापलेली असते आधी अर्थात शारीरिक वेदनेची व्याप्ती जिला त्या शारीरिक अवयवाच्या प्रत्येक प्रमुखाकडे जाऊन त्या प्रकारे त्याची वेदना मिटवावी लागते यासाठी अनेक विशेष वैद्यक उपलब्ध असतात व त्यांच्याकडून तसा विलाज करून घ्यावा लागतो ‌ ही तणाच्या रोगाची ओळख तर व्याधीही मनाला लागणारी व्यथा असते धंद्यातील चढ-उतार नोकरीत होणारी अवहेलना किंवा लहान सहान गोष्टीतून झालेला अपमान यातून तणाव वाढतो आणि हा तणाव तनातून मनाकडे परावर्तित होऊन त्या प्रकारची व्याधी निर्माण होते तर धनासाठी लागणारी कुचंबना ही होते उपाधीची मोठेपणाच्या प्रतिष्ठेला ठोच पोहोचली ,धनाची चोरी झाली, तर उपाधीची कुचंबना होते .या आधी व्याधी आणि उपाधीला टाळण्यासाठी गरज असते महत्त्वाची लागणारी समाधी या समाधीमध्ये जर तन मन एकाग्र करून परमेश्वराची अंतकरणातून प्रार्थना केली तर धर्म गुरु देवाच्या मदतीने  समाधी लागते ही अदी व्याधी उपाधी नष्ट होऊन समाधी लागते व माणूस त्याच्या मदतीने मुक्त होऊ शकतो असे त्यांनी सांगितले.
Back to top button