बीड

प्रभाग क्रमांक 3 ब मधील निवडणुकीच्या अनुषंगाने चुकीच्या बातम्या देवून काँग्रेस पक्षाची बदनामी किंवा प्रभागातील जनतेची दिशाभुल करु नये – गणेश बजगुडे पाटील

प्रभाग क्रमांक 3 ब मधील निवडणुकीच्या अनुषंगाने चुकीच्या बातम्या देवून काँग्रेस पक्षाची बदनामी किंवा प्रभागातील जनतेची दिशाभुल करु नये – गणेश बजगुडे पाटील

प्रभाग क्र. 3 ब मध्ये पाठिंबा देणाऱ्या कोणाचाही काँग्रेसशी तिळमात्र संबंध नाही काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सय्यद फारुक यांना विजयी करा – गणेश बजगुडे
बीड / बीड नगर पालिका निवडणूकीची रणधुमाळी सुरु असताना शहरातील प्रभाग क्रमांक 3 ब मधील एका उमेदवाराची निवडणूक 20 डिसेंबर रोजी होत असून याठिकाणी प्रस्थापित सत्ताधारी उमेदवारांकडून जनतेची दिशाभुल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज वर्तमान पत्रामधुन काँग्रेसच्या उमेदवाराचा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार यांना दिल्याच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या असुन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने बीड शहरात सर्वच प्रभागात स्वबळावर मोठ्या ताकतीने निवडणूक लढलेली असुन यामुळे अनेक प्रस्थापितांना पोटसुळ उठलेला दिसुन येत आहे. प्रभाग क्रमांक 3 ब याठिकाणी देखील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सय्यद फारुक अमीर हे निवडणूक लढवत आहेत काँग्रेस पक्षाचा कोणत्याही उमेदवारास पाठिंबा असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्यांचा काँग्रेसशी तिळमात्र संबंध नाही अशा व्यक्तीच्या नावे काँग्रेसच्या पाठिंब्याची बातमी काढून जनतेची दिशाभुल करण्याचा व काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. काँग्रेस पक्ष त्याग, बलिदान आणि विचारावर चालणारा व विकासात्मक राजकारण करणारा पक्ष असुन शहरात काँग्रेसच्या वाढलेल्या लोकप्रियतेमुळे अशा प्रकारे खोट्या वावड्या उठवल्या जात असुन काँग्रेस पक्षाचा कोणाच्याही पाठिंब्याशी काहीही संबंध नसुन येणाऱ्या 20 तारखेला प्रभाग क्रमांक 3 मधील सर्व सुजान मतदार बंधु भगिनींनी हाताचा पंजा या चिन्हा समोरील बटन दाबून मतदान करावे असे आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांनी केले आहे.
Back to top button