११ वर्षांपासून पंरपरा; जामखेड शहरातून नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या पुढाकाराने मोफत मोहटादेवी दर्शन यात्रेचे आयोजन

११ वर्षांपासून पंरपरा; जामखेड शहरातून नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या पुढाकाराने मोफत मोहटादेवी दर्शन यात्रेचे आयोजन
परंपरेसोबत समाजसेवेचा अनोखा उपक्रम
जामखेड प्रतिनिधी –सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे नगरसेवक अमित चिंतामणी यांनी यंदाही जामखेड शहरातील माता-भगिनींसाठी मोफत मोहटादेवी दर्शन यात्रेचे आयोजन केले आहे. महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमित (भाऊ) चिंतामणी मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
नगरसेवक अमित चिंतामणी हे सलग ११व्या वर्षी हा उपक्रम राबवत आहेत. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी शहरातील महिलांना पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवी गडावर दर्शनासाठी नेले जाते. यावर्षीही बुधवार, दि. २४ सप्टेंबर रोजी जुन्या स्टेट बँकजवळील देशमुख गढी येथून सकाळी ११ वाजता गाड्या सुटणार असल्याची माहिती नगरसेवक अमित चिंतामणी यांनी दिली.
शारदीय नवरात्रोत्सव काळात लाखो भाविक मोहटा देवी गडावर दर्शनासाठी गर्दी करतात. महिलांना या यात्रेतून दर्शनाची संधी मिळावी यासाठी नगरसेवक अमित (भाऊ) चिंतामणी मित्र परिवाराचे विशेष प्रयत्न असतात. धार्मिक परंपरेचा वारसा जपत आणि सामाजिक बांधिलकी जपताना हा उपक्रम शहरात लोकप्रिय ठरला आहे.
अमित चिंतामणी हे विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांचे खंदे समर्थक असून त्यांनी शहरातील माता भगिनींसाठी सतत या यात्रेचे आयोजन करून सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे.



