📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याची कन्या झाली जलसंपदा विभागात अधिकारी

पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याची कन्या झाली जलसंपदा विभागात अधिकारी

दिपाली रोकडेच्या यशामुळे आई-वडिलांचे स्वप्न झाले साकार

जामखेड — कष्टकऱ्याच्या घरात जन्म घेऊन स्वप्नांना पंख देणारी दिपाली रमेश रोकडे हिने आपल्या जिद्दीच्या जोरावर जलसंपदा विभागात अधिकाऱ्याची नोकरी मिळवली आहे. जामखेड नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात प्रामाणिकपणे सेवा करणारे रमेश रोकडे आणि त्यांच्या पत्नी संगिता रमेश रोकडे यांनी मुलीला योग्य शिक्षण देण्यासाठी अनेक अडचणींवर मात केली.

आज दिपालीच्या यशामुळे त्यांच्या मेहनतीला योग्य फळ मिळाले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेच्या निकालानंतर रोकडे कुटुंबात आनंदाश्रू तरळले आहे. शेजारी-पाजारी, नातेवाईक आणि जामखेडकर दिपालीच्या या यशाचे कौतुक करत आहेत.

कष्टाने आणि चिकाटीने यशाची शिखरे पादाक्रांत करता येतात याचे आदर्श उदाहरण म्हणजे दिपाली रमेश रोकडे. तिच्या पुढील वाटचालीसाठी नगरसेवक डॉ.ज्ञानेश्वर झेंडे, माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर,पोपट राळेभात,आदिवासी नेते प्रकाश काळे,राष्ट्रवादी चे नेते सुर्यकांत मोरे, डॉ विठ्ठल राळेभात, डॉ नितीन अनभुले,अनिल यादव, मनोज कुलकर्णी, वसिम सय्यद , सचिन भंडारी आदींनी तसेच सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Back to top button