📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जवळेश्वर देवस्थानास पाच लाखांचा पालखी रथ

जवळेश्वर देवस्थानास पाच लाखांचा पालखी रथ

ज्योती क्रांती मल्टीस्टेटचे चेअरमन आजिनाथ हजारे यांचेकडून अर्पण

*जामखेड । प्रतिनिधी -*

भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष व ज्योती क्रांती मल्टीस्टेटचे चेअरमन आजिनाथ हजारे यांनी तालुक्यातील जवळा येथील ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्र श्री जवळेश्वर देवस्थानास पाच लाख रूपये किंमतीचा पालखी रथ अर्पण केला आहे.

श्रावणी चौथ्या सोमवारी (ता.७) या पालखी रथाचे लोकार्पण करण्यात आले.यानिमित्त ज्योती क्रांती मल्टीस्टेटचे चेअरमन आजिनाथ हजारे व त्यांच्या सौभाग्यवती धनलक्ष्मी हजारे यांचे हस्ते श्री जवळेश्वरास महाअभिषेक करण्यात आला. सकाळी ९ वाजता जवळेश्वर मुकुटाची पालखी रथामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली.यानंतर महाआरती झाली.यावेळी मोठ्या संस्थेने ग्रामस्थ व भाविक सहभागी झाले.

पालखी रथाची टाळमृदंगाच्या गजरात, हर हर महादेवाच्या जयघोषात व बॅण्डच्या वाद्यात मिरवणूक काढण्यात आली. जवळेश्वर मंदिरापासून,विठ्ठल मंदिर, बसस्थानक, ग्रामपंचायत मार्गे पालखी रथाची मिरवणूक काढण्यात आली.यामध्ये मोठ्या संख्येने टाळकरी तसेच भाविक सहभागी झाले. दुपारी १२ वाजणेच्या सुमारास पालखी रथ मिरवणूक जवळेश्वर मंदिरासमोर आल्यानंतर आरती होवून, भाविकांना राजगिरा लाडू प्रसाद देण्यात आला. तर सायंकाळी साडेसात वाजता जवळेश्वराची महाआरती करून भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.

यावेळी हरि महाराज खुने,उद्योजक रणजित पाटील, ज्योती क्रांती मल्टीस्टेटचे उपाध्यक्ष दशरथ हजारे, सेवानिवृत्त अन्न व औषध आयुक्त राजेंद्र पवार, भाजपा वैद्यकिय आघाडीचे तालुकाध्यक्ष डाॅ.दिपक वाळुंजकर, राजेंद्र महाजन, मारूती रोडे, रामलिंग हजारे, गौतम कोल्हे, पांडुरंग वाळके, बिभिषण लेकुरवाळे, अक्षय शिंदे, ॲड.हर्षद वाळुंजकर , राजेंद्र हजारे, सुनील हजारे, संतोष मोहोळकर,संतोष सुरवसे,अंगद वाळुंजकर, संजय आव्हाड, महादेव वाळुंजकर, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग शिंदे, किसन सरोदे , पुरूषोत्तम वाळुंजकर, प्रदिप मंडलेचा ,बाबा कोल्हे, आयुब शेख, पोपट शिंदे,लक्ष्मण लांडगे, लक्ष्मण होले, संकेत हजारे यांच्यासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

*सर्वपयोगी पालखी रथ.*
———————————
श्री जवळेश्वर देवस्थानतर्फे दरवर्षी चैत्रवारी पंढरपुर पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात येतो. या पायीदिंडी सोहळयाला शेकडो वर्षाची परंपरा आहे. मात्र देवस्थानला पालखी रथ नसल्याने, पर्यायी व्यवस्था करावी लागत होती. मात्र आता हक्काचा पालखी रथ झाल्याने, या दिंडी सोहळयाचे महत्व वाढणार आहे. त्याचबरोबर जवळा येथे वर्षभरात वेगवेगळे १० हून अधिक हरिनाम सप्ताह साजरे केले जातात. या सप्ताहामध्ये ग्रंथदिंडी मिरवणूकीसाठी हा पालखी रथ उपयोगी येणार असल्याने भाविक भक्तांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Back to top button