बीड

आदित्य च्या कॅम्पसमध्ये योगोत्सव, विद्यार्थ्यांमध्ये निरोगी जीवनशैलीचा जागर

आदित्य च्या कॅम्पसमध्ये योगोत्सव, विद्यार्थ्यांमध्ये निरोगी जीवनशैलीचा जागर
महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थी, प्राध्यापकांना आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साधकांचे मार्गदर्शन
प्रतिनिधी | बीड
योगामुळे केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. आजच्या ताणतणावाच्या युगात विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच स्वतःला आरोग्याबाबात सुदृढ ठेवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आदित्य ग्रुपच्या संचालिका डॉ. आदिती सारडा यांनी केले.
बीड शहरातील आदित्य एज्युकेशन ग्रुप संचलित विविध महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने  आंतरराष्ट्रीय योग दिन आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा आणि संचालिका डॉ. आदिती सारडा यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या विशेष योग महोत्सवासाठी प्रख्यात योगगुरू व ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे ज्येष्ठ साधक विश्वनाथ गडकर, प्रमोद राख आणि योगशिक्षिका अंजली राख यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी कॅम्पसमध्ये उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेचे थेट प्रात्यक्षिक करून दाखवले. केवळ एक दिवस योग न करता तो दैनंदिन जीवनशैलीचा भाग कसा बनवावा,याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी सजगता निर्माण करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला आदित्य ग्रुपच्या सर्वच शाखांमधील प्राचार्यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये डॉ. हिमांशू श्रीवास्तव (दंत महाविद्यालय), डॉ. विवेक कुलकर्णी (आयुर्वेद महाविद्यालय), प्रा. श्याम भुतडा (कृषी महाविद्यालय), डॉ. सतिश कचरे (जैवतंत्रज्ञान महाविद्यालय), डॉ. अमोल सानप (कृषी अभियांत्रिकी), प्रा. पुष्पराज राठोड (अन्न तंत्रज्ञान), प्रा. बालाजी बहिरवाळ (फिजिओथेरपी)
प्रा. विकास गर्जे (नर्सिंग महाविद्यालय), डॉ. पवार (बी. फार्मसी) व डॉ. रुपाली शिंदे (डी. फार्मसी) यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मयुरी शिंदे यांनी केले,तर आभार प्रा. ढोबळे यांनी मानले. उपस्थितांनी शांतता मंत्राचे पठण केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

निरोगी भारत घडविण्याचा संकल्प
या सामूहिक योग साधना कार्यक्रमात सर्व महाविद्यालयांतील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी एकाच वेळी योगासने करत योगाच्या माध्यमातून निरोगी व सुदृढ भारत घडवूया, असा सामूहिक संकल्प यावेळी केला.
Back to top button