बीड

लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयुष्यमान आरोग्य शिबिर संपन्न

लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयुष्यमान आरोग्य शिबिर संपन्न
—-
 लिंबागणेश :-(दि.१७)बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील  प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत दि.१५ मंगळवार रोजी सकाळी  आयुष्यमान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग सरपंच बालासाहेब  जाधव यांच्या हस्ते यांच्या आयुष्यमान आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी, बाळकृष्ण थोरात , दादा गायकवाड तसेच पत्रकार हरिओम क्षीरसागर व वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती चिटकूलवार, डॉ. घुमरे अविराज तसेच या शिबिरास उपस्थित बीड वरून आलेले आयुष्यमान शिबिरास लाभलेले डोळ्याचे डॉ. श्रीमती ढाकणे यांच्यामार्फत डोळ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश  येथील आरोग्य सहाय्यक लोखंडे अशोक, फार्मासिट ऑफिसर श्रीमती कंचार ,लॅब टेक्निशियन लांडगे,ऋषिकेश शेळके, कर्मचारी हिंदोळे,गटप्रवर्तक शेख नफिसा व परिचर अवसरे , तसेच आरोग्य तपासणी करिता आलेले गावातील मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते . गावातील ग्रामस्थांनी आयुष्यमान शिबिरास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत स्वतःची आरोग्य तपासणी करून घेतली.
Back to top button