विठ्ठल भक्तीची परंपरा आमच्या कुटुंबाची ओळख — दिलीपशेठ बाफना

विठ्ठल भक्तीची परंपरा आमच्या कुटुंबाची ओळख — दिलीपशेठ बाफना
जामखेड ते पंढरपूर कार्तिकी पायी दिंडीचे प्रस्थान
जामखेड प्रतिनिधी:भक्ती, श्रद्धा आणि परमार्थाच्या सागरात आज जामखेड शहर न्हाऊन निघाले. दिलीप चांदमलजी बाफना व आकाश बाफना तसेच विठ्ठल भजनी मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्तिकी एकादशी निमित्त भव्य-दिव्य, अपूर्व असा जामखेड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात सुरू झाला.
सकाळी शहरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकाश बाफना व त्यांच्या सौभाग्यवती पायलताई बाफना यांच्या हस्ते विणा पूजन करून दिंडीचे प्रस्थान झाले. टाळ-मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात, वारकरींच्या उत्साहात ही दिंडी शहरातून निघाली. छत्रपती शिवाजी महाराज पेठेत तसेच दिलीप मशिनरीसमोर दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी दिंडीचे मुख्य प्रवर्तक माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपशेठ बाफना म्हणाले, ही दिंडी आमच्या कुटुंबीयांनी सुरू केलेली परंपरा आहे. ही विठ्ठल भक्तीची वाट आमच्या पुढील पिढ्यांनीही कायम ठेवावी, आणि वारकरी संप्रदायाची सेवा अखंड सुरू राहावी, अशी माझी प्रार्थना आहे.
तर आयोजक आकाश बाफना म्हणाले, विठ्ठल भजनी मंडळाच्या सहकार्याने हा दिंडी सोहळा गेली तीस वर्षे अखंड सुरू आहे. हा सेवेचा वारसा मला माझ्या वडिलांकडून लाभला आहे. ‘माझ्या वडलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा साधावा!’ या संतवचनांप्रमाणे मी वारकर्यांची सेवा करत राहीन.
यावेळी प्रा. मधुकर राळेभात, हरिभाऊ बेलेकर, सुनिल शिंदे, अनिल बाफना, मिथून बाफना, महेश नगरे, चंद्रकांत ढाळे, नगरसेवक गणेश आजबे, अशोक बोरा, शिवकुमार डोंगरे, तसेच ह.भ.प. पंढरीनाथ राजगुरु, विक्रम बागडे, महारूद्र नागरगोजे, संतोष राळेभात, अर्जुन रासकर, विवेकानंद मंजरतकर, विनायक राऊत, पांडुरंग माने, दशरथ निमोणकर, प्रविण राळेभात, रोशन बाफना, उमेश राळेभात, सुरेश भोसले, निलेश पारख तसेच आकाश बाफना यांच्या सौ.पायलताई आकाश बाफना, प्राजक्ताताई भोसले, सरिताताई गायकवाड आदी भजनी मंडळ आदींनी सहभाग घेतला.
या दिंडी सोहळ्याला पंचक्रोशीतील महाराज मंडळी, गुणीजन, गायक, वादक, टाळकरी, भाविक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



