📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई व नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमी यांचा संयुक्त उपक्रम ; मनोहर अंबाजोगाई महोत्सव – २०२६

रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई व नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमी यांचा संयुक्त उपक्रम ; मनोहर अंबाजोगाई महोत्सव – २०२६

*_तालुकास्तरीय वैयक्तिक व समुह नृत्य स्पर्धेचे आयोजन

अंबाजोगाई (प्रतिनिधी)रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई व नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी मनोहर अंबाजोगाई महोत्सव – २०२६ आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने तालुकास्तरीय वैयक्तिक व समुह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाईचे अध्यक्ष भिमाशंकर शिंदे व सचिव सुनील व्यवहारे यांनी दिली आहे.

रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई व नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमी यांच्या वतीने नृत्य क्षेत्रात शहरातील नव्या प्रतिभांना एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध व्हावे या विधायक उद्देशाने रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी मनोहर अंबाजोगाई महोत्सव – २०२६ आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने तालुकास्तरीय वैयक्तिक व समुह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुकास्तरीय वैयक्तिक नृत्य स्पर्धा रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी वेळ – सकाळी १० वाजता तर तालुकास्तरीय समूह नृत्य स्पर्धा रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी वेळ – दुपारी ३ वाजता, दोन्हीही स्पर्धा आद्यकवि मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह, अंबाजोगाई (जि.बीड) या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धा लहान गट इयत्ता १ ली ते ४ थी, मोठा गट इयत्ता ५ वी ते १० वी, खुला गट इयत्ता ११ वी पासून पुढील मुली व महिलांसाठी आणि दिव्यांग गट – शारीरिक अपंगत्व प्रवर्गातील सर्व विद्यार्थी या गटात होणार आहेत. या स्पर्धेतील नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत. वैयक्तिक नृत्य प्रकारामध्ये विद्यार्थ्यांची पूर्वनिवड चाचणी (ऑडीशन) होईल., वैयक्तिक नृत्यासाठी कालावधी ३ मिनिटे तर समुह नृत्यासाठी ५ मिनीटे वेळ दिला जाईल., नांव नोंदणी शिवाय स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही., ऐनवेळी स्पर्धेच्या नियमात कुठलीही पुर्वसुचना न देता स्पर्धेत बदल करण्याचे सर्व अधिकार आयोजक व संयोजकांकडे राहतील., ज्या विद्यार्थ्यांचे निवड चाचणी मध्ये (ऑडीशन) निवड होईल त्यांनाच स्पर्धेत भाग दिला जाईल., परीक्षकांचा निर्णय अंतिम राहिल., गीत निवडण्याचे पुर्ण स्वातंत्र शाळांना व विद्याथ्यर्थ्यांना राहिल. फक्त गीत अश्लील नसावे याची दक्षता घ्यावी., वैयक्तिक नृत्य स्पर्धेची निवड चाचणी गुरूवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ होईल. प्रत्येक गटामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय या प्रमाणे पारितोषिके देण्यात येतील. लहान, मोठा, खुला, दिव्यांग गटात समावेश असलेल्या ज्यांना वैयक्तिक व समुह नृत्य स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी नांव नोंदणीसाठी रो.भिमाशंकर शिंदे (मोबाईल नंबर – ९७६५१४४८७३), रो.सुनील व्यवहारे (मोबाईल नंबर – ९३२५७६२८१७), प्रा.अनंत कांबळे (मोबाईल नंबर – ८६००१३४००७) आणि गणेश तौर (मोबाईल नंबर – ९४२३८८६५२८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई व नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमी यांच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा.सौ.आरती भिमाशंकर शिंदे (लिंबगावकर), सुशील कुंबेफळकर, विक्रमसेन आगळे, गोविंद जगधने, बालासाहेब वरने, बळीराम उपाडे, सत्यम जोगदंड यांनी पुढाकार घेतला आहे.

 

Back to top button