राजकीय

….आता निलेश राणेंनी साधला शरद पवारांवर निशाणा

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आयोजित पार पडलेल्या भर पावसातील सभेला दोन वर्ष पूर्ण झाली तसेच या सभेनंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापित होऊ शकली, असं म्हटलं जातं. या घटनेला काल २ वर्ष पूर्ण झाल्याने सोशल मीडियावर यासंदर्भात सर्वत्र पोस्ट केल्या जात होत्या. याबाबत आता निलेश राणे यांनी ट्विट करून टीका केली आहे.

निलेश राणे यांनी आता पावसात घेतलेल्या सभेवरून शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे आहे. ते म्हणाले, ‘काय झालं जर पवार साहेबांच्या सभेला दोन वर्ष पूर्ण झाली. या दोन वर्षात महाराष्ट्र किती वर्ष मागे गेला ते पण सांगा, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना काय मिळालं ते पण सांगा.’ असा खोचक सवाल त्यांनी ट्विटमधून विचारलाय.

याशिवाय ते पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्र एक नंबर पण कशात तर फक्त कोरोनामध्ये, असे विषय हाताळले असते तर पवार साहेबांचं महाराष्ट्रामध्ये महत्त्व अधिक असतं’, अशी जहरी टीका त्यांनी ट्विटमधून केली आहे. निलेश राणे नेहमीच आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीका करताना दिसतात.

Back to top button