बीड
आदित्य महाविद्यालयाच्या कृषी दूतांनी दिली अंथरवन पिंपरी तांडा येथे दशपर्णी अर्क प्रक्रिया बद्दल प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली

आदित्य महाविद्यालयाच्या कृषी दूतांनी दिली अंथरवन पिंपरी तांडा येथे दशपर्णी अर्क प्रक्रिया बद्दल प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी संलग्नित व आदित्य शिक्षण संस्था, बीड संचलित आदित्य कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत .आदित्य कुऱ्हें, स्वप्नील शिंदे, आनंत शिंदे, रुधिर आघाव, सचिन वनवे, स्वप्नील काळे, रोहन आकोसकर, विकास पिंपळे, बालाजी पवार ,यशपाल ओव्हाळ, यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव आणि कृषी संलग्नता उपक्रम २०२६- २७ अंतर्गत अंथरवन पिंपरी तांडा येथे दशपर्णी अर्क हे कसे बनवावे यासंदर्भात गावातील शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.
दशपर्णी अर्क हे उत्तम प्रतीचे कीटनाशक आहे. याचा उपयोग सेंद्रिय शेतीमध्ये केला जातो. यामध्ये कडुलिंबाचे पान, बेशरम, घाणेरी, करंज, लाल कनेर, पांढरा धोत्रा, वन एरंड, सिताफळ, पपई, गुळवेल इत्यादी दहा पानांचा अर्क, गाईचे शेण व गोमूत्र वापरले जाते. त्यामुळे पिकांचा किडीपासून बचाव होतो. सर्व पिकांवर हा अर्क प्रभावी असल्याने कीटनाशकावर वेगळा खर्च करावा लागत नाही. याबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. या प्रात्यक्षिकाकरिता कृषी दुतांना महाविद्यालयातील कृषी विद्या विभागाचे विषय तज्ञ प्रा. प्रिया गव्हाणे यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच या उपक्रमाकरिता विद्यार्थ्यांना आदित्य शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. आदितीजी सारडा मॅडम, आदित्य कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्यामजी भुतडा, कार्यक्रम समन्वयक डॉ. ब्रह्मदेव मुंडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. धनंजय सातपुते व ग्राम सहवास अधिकारी डॉ. एस एस एडके महाविद्यालयातील इतर प्राध्यापक वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
.



