बीड
जिल्हा रुग्णालयात NSS स्वयंसेवकांची परिचय व मार्गदर्शन भेट

बीड : सौ. के. एस. के. महाविद्यालय, बीडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा रुग्णालय, बीड येथील ICTC विभागास परिचय व मार्गदर्शन भेट आयोजित करण्यात आली.
या भेटीदरम्यान ICTC समुपदेशक श्री. जनार्धन माचपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना ICTC विभागाच्या कार्यपद्धतीची तसेच विविध उपक्रम व योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. स्वयंसेवकांनी जिल्हा रुग्णालयातील ICTC विभागातील विविध कक्षांना भेट देऊन तेथील प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून HIV/AIDS प्रतिबंध, जनजागृती, समुपदेशन व युवकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद व्ही. क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील-देवळाणकर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे व पदव्युत्तर संचालक प्रा. डॉ. शंकर राऊत यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पी. आर. वाणी, डॉ. पल्लवी इरलापल्ले, NSS Youth Icon सिद्धार्थ वाघमारे, तसेच निखिल काकडे, कु. शीतल ढोरमारे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी ‘विहान’ NGO प्रकल्पास भेट देऊन तेथील कार्याची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी ही भेट सामाजिक बांधिलकी, आरोग्यविषयक जनजागृती आणि सेवाभाव वृद्धिंगत करणारी ठरली.