बीड
“बाळासाहेबांचे विचार हेच आमचे शस्त्र – जातेगावातून शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव मडके यांचा निर्धार”

“बाळासाहेबांचे विचार हेच आमचे शस्त्र – जातेगावातून शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव मडके यांचा निर्धार”
गेवराई (प्रतिनिधी) जातेगाव येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त भव्य व दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, लोकमाता अहिल्यादेवी होळकर आदी थोर महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव (बापू) मडके यांनी ठामपणे सांगितले की, “बाळासाहेबांचे विचार हेच आमचे शस्त्र असून त्याच विचारांच्या जोरावर शिवसेना आजही अन्यायाविरोधात लढत आहे. बाळासाहेबांचा वैचारिक वारसा पुढील पिढीपर्यंत नेण्याचा संकल्प आम्ही केला आहे.”
या कार्यक्रमाचे आयोजन कट्टर शिवसैनिक दादासाहेब वाघमारे यांनी केले होते. कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख बीड चंद्रकांत नवले, अॅड. नारायण शिंदे (उपजिल्हाप्रमुख), युवासेना तालुकाध्यक्ष बिभीषण मोघे, शहरप्रमुख मुकेश महाजन, विक्रम भोसले, गणेश पवार, उमेश शिंदे, प्रकाश नरनाळे, सूरज वाघमारे, माजी सरपंच सतीश चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाला उद्धव राऊत, कैलास राग, सचिन जाधव, ओम चव्हाण, सुरेश वाघमारे, कांता भाऊ जाधव, गजानन डोळसे, मोरे मामा, लक्ष्मण उनवणे, शंकर पांढरे, आबाजी कोकाट, लक्ष्मण डेंगळे, लक्ष्मण नरोडे व इतर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान शिवसेनेची वैचारिक भूमिका अधिक बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, त्यांचे राष्ट्रप्रेम व निर्भीड नेतृत्व समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प उपस्थित शिवसैनिकांनी केला. संपूर्ण जातेगाव परिसरात जयंती उत्साह व शिवसेनेच्या घोषणांनी भारलेले वातावरण पाहायला मिळाले.



