चंपावती महोत्सव २०२६ मध्ये भगवान इंग्लिश स्कूल अव्वल

चंपावती महोत्सव २०२६ मध्ये भगवान इंग्लिश स्कूल अव्वल
बीड (प्रतिनिधी) – बीड क्षेत्रीय प्रतिनिधी श्री. अनिल जगताप यांनी सांस्कृतिक चंपावती महोत्सव २०२६ मध्ये मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. या महोत्सवात या वर्षाचा मानाचा महाकांडक भगवान इंग्लिश स्कूल मिडियम शाळेने पटकावत उल्लेखनीय यश संपादित केले. महोत्सवात नृत्य, नाट्य, गायन, वक्तृत्व, चित्रकला, समूहगान, एकांकिका, लोकनृत्य अशा विविध कला कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवले. प्रत्येक सादरीकरणात शिस्त, सृजनशीलता आणि आत्मविश्वास दिसून आला. याच जोरावर भगवान इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जवळपास १७ व १८ बक्षिसे पटकावत महाकांडकावर आपले नाव कोरले.
या शाळाचा आनंद साजरा करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी शाळेच्या वतीने विशेष बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अनिल जगताप (शिवसेना जिल्हाप्रमुख) उपस्थित होते. तसेच प्रतीक कांबळे, दैनिक दिव्य लोकप्रभा उपसंपादक नितीन क्षीरसागर, डॉ. राजीव घुगे, घुगे मंडळ शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकगण व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापकांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे हे यश शक्य झाल्याचे सांगितले. शिक्षकगणांनी वर्षभर घेतलेल्या सरावाचे फळ आज मिळाल्याची भावना व्यक्त केली. पालकवर्गांनीही शाळेच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.



