बीड

जामखेडमध्ये ‘स्कायलाईन टॉवर’चा शुभारंभ उत्साहात आधुनिक सुविधांनी सुसज्ज 2 BHK फ्लॅट्स; बुकिंग सुरू

जामखेडमध्ये ‘स्कायलाईन टॉवर’चा शुभारंभ उत्साहात

आधुनिक सुविधांनी सुसज्ज 2 BHK फ्लॅट्स; बुकिंग सुरू

राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्जसुविधा उपलब्ध

जामखेड | प्रतिनिधी :

शहराच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या ‘स्कायलाईन टॉवर’ या बहुमजली निवासी प्रकल्पाचा शुभारंभ शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर उत्साहात पार पडला. शिलादीप एंटरप्रायझेस (डेव्हलपर्स) शिलादीप डेव्हलपर्स चे संचालक डॉ प्रशांत गायकवाड व संचालक तथा इंजिनिअर आदर्श डोंगरे यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे जामखेडमध्ये आधुनिक आणि दर्जेदार घरांचे स्वप्न साकार होत आहे.
आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर सकाळी १०.३५ वाजता मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच ‘स्कायलाईन टॉवर’च्या कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन करून प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शिलादीप डेव्हलपर्सचे संचालक डॉ. प्रशांत गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,जामखेडकरांना परवडणाऱ्या दरात आधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार घरे उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे. गुणवत्ता व पारदर्शकता यावर आमचा विशेष भर आहे.

या उद्घाटन सोहळ्यासाठी शिलादीप डेव्हलपर्स चे इंजिनिअर आदर्श डोंगरे,किरण सुरवसे, कॉन्ट्रक्टर संदीपान गिते, विक्रम फुंदे, डॉ. सादेख पठाण, डॉ. भरत देवकर, डॉ. विकी दळवी, डॉ. आबेद जमादार, डॉ. सुशिल पन्हाळकर,डाॅ.मेघराज चकोर,डाॅ.अक्षय अडाले,अरुण उगले, प्रा. संभाजी मुळे, संभाजी पवार, अमोल गायकवाड, अभिमन्यू पवार,माजी सरपंच विजय पवार, पवनराजे उगले, महेश यादव, गव्हाणे तात्या, संतोष गुंदेचा, मनोज कुलकर्णी, दशरथ साळुंके,राम खोटे,शहाजी निमोणकर,प्रफुल सोळंकी, मयुर भोसले, आशिष काशिद, सचिन गरड आदी मान्यवर उपस्थित होते.
—————————————
विशेष सुविधा:
पहिल्या १० बुकिंगवर विशेष सवलत
लहान मुलांसाठी स्वतंत्र प्ले ग्राउंड
आकर्षक ओपन स्पेस व मंदिर परिसर
२४ तास पाणी व वीज सुविधा
सुसज्ज पार्किंग व्यवस्था
चारही बाजूंनी सुरक्षित कंपाऊंड
———————————————–
प्रकल्पात आकर्षक 2 BHK फ्लॅट्सची रचना असून प्रशस्त हॉल, आधुनिक किचन, हवेशीर बेडरूम्स आणि सुबक बाथरूम्सची योजना करण्यात आली आहे. ग्राहकांना सर्व राष्ट्रीयकृत बँकांकडून गृहकर्ज सुविधा उपलब्ध आहे. ठिकाण – स्कायलाईन टॉवर, महावीर मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, जामखेड, जि. अ. नगर बुकिंगसाठी इच्छुकांनी तात्काळ
+919423389444 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शिलादीप डेव्हलपर्स चे संचालक डॉ प्रशांत गायकवाड यांच्या कडून करण्यात आले असून जामखेडमध्ये आधुनिक जीवनशैलीचा नवा अध्याय ‘स्कायलाईन टॉवर’च्या माध्यमातून सुरू झाला आहे.

Back to top button