📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

आ.रोहित पवार यांना ‘Z+’झेड प्लस सुरक्षा द्यावी अभय शिंगवी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आ.रोहित पवार यांना ‘Z+’झेड प्लस सुरक्षा द्यावी

अभय शिंगवी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत उपस्थित झालेल्या संशयाच्या मुद्द्यांवरून राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी दोन डिजिटल पत्रकार परिषदांद्वारे विविध मुद्दे मांडले. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याची भूमिका अभय शिंगवी यांनी मांडली आहे.
पश्चिम महाराष्ट्र विभागाचे तज्ञ विभागीय सहसमन्वयक, जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळ, मुंबई येथील अभय शिंगवी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ.रोहित पवार यांना ‘Z+’ झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.

शिंगवी यांनी निवेदनात म्हटले आहे की, आ.रोहित पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल माध्यमातून जे प्रश्न उपस्थित केले, त्यामुळे त्यांच्या जीवितास संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. सरकारने तातडीने याची दखल घेऊन त्यांना उच्चस्तरीय सुरक्षा द्यावी.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन सरकार योग्य निर्णय घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या मागणीमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Back to top button