बीड
राज्य शासनाच्या दुर्गोत्सवात सोहम मोरेचा सहभाग; मुख्यमंत्र्याच्या सहीचे सोहमला मिळाले प्रमाणपत्र

राज्य शासनाच्या दुर्गोत्सवात सोहम मोरेचा सहभाग; मुख्यमंत्र्याच्या सहीचे सोहमला मिळाले प्रमाणपत्र
बीड दि.२५(प्रतिनिधी)- बीड तालुक्यातील मसेवाडी येथील अशोक मोरे ( सर) यांचा मुलगा चि. सोहम अशोक मोरे याने महाराष्ट्र शासनाच्या अमृत दुर्गोत्सव -2026 मध्ये सहभाग घेऊन कोंढाणा किल्ला बनविला.
त्याबद्दल त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचे प्रमाण पत्र प्रदान करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की
महाराष्ट्र शासनाच्या अविरत प्रयत्नांमुळे शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या बारा दुर्गाना जागतिक वारसा वास्तू म्हणून वैश्विक ख्याती मिळालेली आहे. या अनुषंगाने राजे शिवछत्रपतींना मानवंदना प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दुर्गोत्सव -2026 चे
आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाने आयोजित करण्यात आलेल्या या दुर्गोत्सव 2026 मध्ये बीड तालुक्यातील मसेवाडी येथील अशोक मोरे सर यांचा मुलगा चि. सोहम याने सहभाग घेऊन किल्ला बनविला. या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाच्या जतन व संवर्धन मोहिमे मध्ये सहभागी होऊन योगदान दिले. त्याबद्दल त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचे प्रमाण पत्र प्रदान करण्यात आले आहे. सोहम मोरे याने बनविलेला किल्ला पाहुन मसेवाडी येथील ग्रामस्थ गावचे संरपच, उपसरपंच यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी सोहमचे कौतुक केले. सोहम मोरे इयत्ता 8 वी या वर्गात भगवान विद्यालय बीड येथे शिक्षण घेत असून सध्या सोहमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
______________________________ __



