बीड

जामखेडमध्ये नर्सची संशयास्पद आत्महत्या

जामखेडमध्ये नर्सची संशयास्पद आत्महत्या

जामखेड प्रतिनिधी:
जामखेड शहरातील बस स्थानक परिसरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये शबनम दस्तगीर सय्यद (वय २९) या नर्सने बाथरूममध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

गुरुवारी (दि. २३) सकाळी १० वाजता त्या नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या. सकाळी साडेदहा वाजता त्या हॉस्पिटलमधील बाथरूममध्ये गेल्या, मात्र बराच वेळ बाहेर न आल्याने कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून पाहिले असता त्या बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
नंतर त्यांना जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी २.३० वाजता डॉक्टरांनी शबनम यांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केले.

मयताच्या हातावर इंजेक्शन टोचल्याच्या खुणा आढळून आल्या असून, नेमके कोणते औषध घेतले याचा शोध घेण्यासाठी व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Back to top button