बीड

जलयात्रेतून संस्कृती आणि परंपरेचा सन्मान : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जलयात्रेतून संस्कृती आणि परंपरेचा सन्मान : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

चौंडी येथून गोदा ते नर्मदा जलयात्रेचा शुभारंभ

जामखेड प्रतिनिधी: श्रीक्षेत्र चौंडी हे मराठी संस्कृतीचे माहेरघर असून ‘गोदा ते नर्मदा’ ही जलयात्रा केवळ भौगोलिक प्रवास नाही, तर इतिहास,अध्यात्म आणि लोकभावनेचा सेतू आहे, जलयात्रेतून संस्कृती आणि परंपरेचा सन्मान असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

जामखेड तालुक्यातील चौंडी येथे गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’चा शुभारंभ त्यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुशासन, महिला सक्षमीकरण, जलसंवर्धन व लोककल्याणाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्यातून समाजहिताचा शाश्वत वारसा उभा राहिला आहे. राज्य शासन जलसिंचन व विकासासाठी कटिबद्ध असून मोठ्या प्रमाणात प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे.

सभापती राम शिंदे यांनी सांगितले की, अहिल्यादेवींच्या कार्यातून जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित होते. जन्मभूमी ते कर्मभूमी या संकल्पनेतून चौंडी येथून निघालेली ही यात्रा जनतेमध्ये जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करेल.जलयुक्त शिवारसारख्या उपक्रमांमुळे अनेक गावे टंचाईमुक्त झाली असल्याचे त्यांनी सांगितले.जलसंवर्धनाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला.

प्रसंगी खासदार रामराव वडकुते, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील,आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठल लंघे, आमदार अमोल खताळ, ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात,शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, माजी सभापती डॉ.भगवान मुरुमकर,सभापती पै.शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे, ॲड.अजय काशिद,भाजपा शहर मंडल तालुकाध्यक्ष संजय काशिद, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, शिवसेना युवा नेते आकाश बाफना,रविंद्र सुरवसे, पांडुरंग उबाळे, सभापती तथा नगरसेवक मोहन पवार,नगरसेवक प्रा.विकी घायतडक, प्रवीण चोरडिया,पवन राळेभात,अमित जाधव तसेच जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, प्रवीण कोल्हे, देविदास महाराज, पुंडलिक महाराज जंगले शास्त्री, डॉ. विकासानंद महाराज मिसाळ, आदिनाथ शास्त्री महाराज, राम महाराज झिंझुर्डे, दयानंद महाराज कोरगावकर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button