📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर जनवारे बांधल्यामुळे शेतकऱ्याच्या वाहतुकीस खोळंबा.               

शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर जनवारे बांधल्यामुळे शेतकऱ्याच्या वाहतुकीस खोळंबा.

तात्काळ खाडेवाडी येथील रस्ता खुला करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी.
नांदुर घाट. प्रतिनिधी. केज तालुक्यातील नांदुर घाट जवळ असलेल्या खाडेवाडी येथील गावालगत शेतीला जाण्यासाठी महत्त्वपूर्ण असणारा रस्ता आजूबाजूच्या काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर जाणाररे बांधून बंद पाडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तेथील शेतकऱ्यांनी देखील आम्हाला पेरणीसाठी किंवा शेती मशागतीसाठी हा रस्ता खुला करून द्यावा जर शेती मशागतीसाठी जात असताना 33 फुटाचा रस्ता असून फक्त पाच ते सहा फूट शिल्लक असतो बाकीच्या जागेवर जनावरे बांधलेली असतात आणि जाताना येताना जर धक्का लागला तर जनावराची भरपाई देखील मागतात त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना करून हा रस्ता खुला करून द्यावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. राज्यामध्ये बांधावरून किंवा रस्त्यावरून शेतकऱ्यांचे भांडणे लक्षात घेता शासनाने तात्काळ उपाय योजनेसाठी आदेश दिलेले असताना या रस्त्याकडे मात्र संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. तात्काळ रस्ता खुला करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
Back to top button