बीड

धानोरा रोड 50 फूट रुंदीचा करण्यात यावा- बीड शहर बचाव मंच व सर्वपक्षीय प्रतिनिधींची मुख्याधिकारी कडे मागणी

धानोरा रोड 50 फूट रुंदीचा करण्यात यावा- बीड शहर बचाव मंच व सर्वपक्षीय प्रतिनिधींची मुख्याधिकारी कडे मागणी
बीड (प्रतिनिधी ) : शहरातील धानोरा रोडच्या सुरू झालेल्या कामाच्या संदर्भात आज दि.१ जानेवारी २०२५ रोजी बीड शहर बचाव मंच व सर्वपक्षीय प्रतिनिधींची नगर परिषद मुख्याधिकारी  यांच्या कार्यालयामध्ये महत्त्वाची बैठक घेण्यात आली.या बैठकीमध्ये धानोरा रोडचे नवनिर्माण वाढत चाललेल्या विस्तारानुसार व रहदारीच्या गरजेनुसार पुरेशा रुंदीकरणासह करण्यात यावे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश फडसे साहेब यांनी बीड नगर परिषदेचा कार्यभार हातात घेतल्यानंतर तात्काळच बऱ्याच वर्षांपासून व खूपच काळ प्रलंबित राहिलेल्या धानोरा रोड साठी प्राधान्यक्रम देऊन नव निर्मिती साठी व त्यासंदर्भातील मंजुरींसाठी सहकार्य केलेले आहे. तरी वस्तुस्थिती अन्वये धानोरा रोड हा बीड शहराला नूतन मुख्य रेल्वे स्थानकाला तसेच अनेकानेक गाव खेड्यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. याच रस्त्यावर नऊ ते दहा शाळा-विद्यालये आहेत. तसेच शहराच्या वाढत्या विस्ताराबरोबरच वाढत्या लोकसंख्येप्रमाणे धानोरा रोड वरून मोठे दळणवळण दररोज होत असते. धानोरा रोड वरून होणाऱ्या दैनंदिन रहदारीच्या गरजेनुसार या रस्त्याचे नवनिर्माण भक्कम पद्धतीचे, दर्जेदार व पुरेशा रुंदीकरणासह होणे गरजेचे आहे. तरी स्थानिक जनतेच्या व रहदारीच्या गरजेनुसार या रस्त्याचे निर्माण कमीत कमी 50 फूट रुंदीकरणासह करण्यात यावे अशी मागणी बीड शहर बचाव मंच व सर्वपक्षीय प्रतिनिधींच्या वतीने बीड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी निलेश फडसे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ५० फुट रुंदीकरणासह रस्त्याचे निर्माण न झाल्यास. लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देखील निवेदनात दिला आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्याने बीड शहर बचाव मंचाचे मार्गदर्शक प्रा.कॉ. डी.जी तांदळे , अध्यक्ष नितीनजी जायभाये, संपादक- पत्रकार साहस आदोडे, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय तांदळे, शिवसेना जि. संघटक रतनजी गुजर, एस.डी.पी. आय. पार्टीचे काझी तखियोद्दिन, कलीमभाई फारोकी, दिशान फारोकी, समीर काजी, रा.काॅ. श.प.गटाचे अमोल पारवे,रा.काॅ. श.प.गटाचे आम्रपाली साबळे, निवृत्त पो.नि. गोरख दिवे, पत्रकार नितेश उपाध्याय आदी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
Back to top button