बीड

न्यू इंग्लिश स्कूल, राजुरी येथे आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात संपन्न!

न्यू इंग्लिश स्कूल, राजुरी येथे आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात संपन्न!

विद्यार्थ्यांची संतांच्या वेशभूषेत मिरवणूक; ग्रामस्थांनी केले औक्षण व स्वागत

जामखेड (राजुरी) प्रतिनिधी –दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, राजुरी येथे आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडी सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात पार पडला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत सोपान, मुक्ताई आदींच्या वेशभूषा परिधान करून पारंपरिक टाळ-मृदंगाच्या गजरात भजनी दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

विद्यार्थी दिंडीचे स्वागत राजुरी गावचे सरपंच सागर कोल्हे, नानासाहेब खाडे उपसरपंच, माजी सरपंच सुभाष काळदाते, मा.सरपंच गणेश कोल्हे, पोलीस पाटील दत्तात्रय मोरे, शिवदास उगलमुगले (विविध कार्यकारी सेवा सोसायटी राजुरी ),ग्रामपंचायत सदस्य सुरज गायकवाड, बाळासाहेब मोरे,सौ. संगीताताई मोरे, नानासाहेब काळदाते, मच्छिंद्र कोल्हे, रामभाऊ कोल्हे,धनराज कोल्हे, धर्मराज मोरे, सौ. अरुणाताई कंदले, सुभाष घुले, मगुबाई शेख, भास्कर कोल्हे, रघुनाथ गायकवाड (गुरुजी), जि.प.प्राथ. शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब मोरे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी केले.

कार्यक्रमात ज्ञान कैवल्य वारकरी संप्रदायाचे संस्थापक नारायण (महाराज) दौंड,हनुमान गायकवाड, बळीराम पिसाळ, सुभाष कोल्हे, दत्तात्रय काळदाते, बाळासाहेब माने, भाऊसाहेब काळदाते व गावातील वारकरी, भजनी मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ग्रामपंचायत कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंग, पखवाज, पेटीच्या तालावर गवळणी, अभंग, भजन सादर केले. विद्यार्थ्यांनी फुगडी खेळून आणि पारंपरिक गाणी म्हणत उपस्थितांचे मन जिंकले. महिलांनीही फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.

या कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीतेसाठी नवनियुक्त मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक राजेंद्र पवार, सुनीता पिसाळ, जुबेर सय्यद, सुभाष बोराटे, विजय क्षिरसागर, अक्षय मोहिते, उमराव लटपटे, हनुमान राऊत,चौभारे सर,तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. दिंडीच्या शेवटी विद्यार्थ्यांना केळी व राजगिरा लाडूंचे वाटप करण्यात आले.
——————————————-
*विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी गायकवाड सरांची नवी दिशा*

ल.ना.होशिंग विद्यालय चे पर्यवेक्षक पदावरून प्रवीण गायकवाड यांनी १ जुलै २०२५ रोजी न्यू इंग्लिश स्कूल, राजुरी येथे
मुख्याध्यापकपदाचा पदभार स्विकारला. कार्यभार स्विकारताच त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली असून सामाजिक कार्यालाही प्राधान्य देत आहेत.

Back to top button