बीड
माऊली माऊली गुरुराज माऊली च्या जयघोषात भव्य शोभायात्रा

मन्मथ स्वामी म्हणजे श्रद्धा विश्वास व सेवेचे फळ देणारी माऊली-सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर
बीड प्रतिनिधी:-श्री क्षेत्र पावन भूमी कपिलधार हे महान संत शिरोमणी व भक्तांची इच्छा व अपेक्षा पूर्ण करणारी माऊली म्हणजे मन्मथ स्वामी महाराज हे आहेत असे उद्गार शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर यांनी 41 व्या अनुष्ठानाच्या सांगता प्रसंगी आपले विचार व्यक्त केले .
सद्गुरु शिवानंद शिवाचार्य तमलूरकर महाराज यांचे 41 अनुष्ठान दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी संपन्न झाले या अनुष्ठान सांगता प्रसंगी मनोगत व्यक्त केले, यावेळी भक्तगणांनी महाराजांची भव्य दिव्य अश्वारूढ शोभायात्रा काढण्यात आली होती .या शोभा यात्रेमध्ये महिलांनी फुगड्यांचा आनंद घेतला ,याबरोबरच मन्मथ स्वामी महाराजांच्या नामाचा गजर करत श्री मन्मथ मुक्तिधाम मठापासून मन्मथ स्वामी मंदिरापर्यंत ही सवाद्य मिरवणूक आल्यानंतर श्री मन्मथ स्वामी समाधी दर्शन घेऊन तमलूरकर महाराजांनी 41 व्या अनुष्ठान दरम्यान जमलेल्या भाविक भक्तांना अनमोल असे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की मन्मथ स्वामी हि कृपा करणारी माऊली आहे स्वामींची आपण मनोभावे सेवा केली तर त्याचे फळ निश्चित संत शिरोमणी मन्मथ स्वामी आपणास देतात .या ठिकाणी जमलेल्या चार राज्यातील भक्तगणांच्या असंख्य संख्येवरून असे दिसते की प्रत्यक्ष भगवान मन्मथ स्वामी महाराज यांनी आपल्या भक्त गणावर कृपाशीर्वाद केला आहे व त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण केल्या आहेत, त्यांच्या सेवेचे फळ त्यांना मिळालं त्यामुळेच हा असंख्य जन समुदाय गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी आपली सेवा करत आहेत
चौकट….
गुरुमाऊली हे कल्पवृक्ष आहेत आपले इच्छित फळ देण्यासाठी ते सदैव भक्तांच्या पाठीशी उभे असतात फक्त आपण मनोभावे त्यांची सर्वांनी सेवा केली पाहिजे.
गुरुमाऊलीच्या सानिध्यात येऊन त्यांची सेवा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे गुरुच्या आशीर्वाद लाभल्या शिवाय आपल्या जीवनात आनंद समाधान व यश हे मिळत नाही गुरुचा कृपा आशीर्वाद मिळाला की आपले जीवन आनंदी होतेच.
-विश्वनाथ आप्पा स्वामी
मन्मथ स्वामी देवस्थान पुजारी, कपिलधार