बीड
नारायणगड चा घाट उतरून पायी दिंडीचे पंढरपुरकडे प्रस्थान.. ज्ञानोबा तुकाराम जयघोषात वारकऱ्यात उत्साह संचारला..

नारायणगड चा घाट उतरून पायी दिंडीचे पंढरपुरकडे प्रस्थान.. ज्ञानोबा तुकाराम जयघोषात वारकऱ्यात उत्साह संचारला..
कोळगाव, दि.१४ (बाळासाहेब घाडगे) – नारायणगड संस्थानच्या वतीने पायी दिंडी सोहळा महंत श्री ह भ प मठाधिपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान दि.१४ जूलै रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले. नगद नारायण महाराज की जय, ज्ञानोबा तुकाराम महाराज की जय, जय हरी विठ्ठल, जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला. भगव्या पताका घेऊन, टाळ मृदंगाच्या गजरात नारायणगड नागमोडी वळणे घाट उतरून पहिला मुक्कामासाठी बेलुरा पडला.
धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाणार्या श्री क्षेत्र नारायण गडाच्या वतीने सालाबादप्रमाणे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दि.१४ जूलै ते २३ जूलै २०२६ या काळात पंढरपूर पायी दिंडीचे आयोजन श्री क्षेत्र नारायणगड संस्थान चे मठाधिपती हभप मंहत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली, उत्तराधिकारी हभप संभाजी महाराज यांच्या करण्यात आले. दरम्यान दि.१४ जूलै रोजी मोठ्या संख्येने गडावर वारकरी भाविक भक्त टाळकरी, झेंडेकरी जमले होते. महिला मंडळ युवक पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित झाले. दुपारच्या महाप्रसाद वाटप करुन भोजन करण्यात आले. ठीक चार वाजता संत महंत, वारकरी, टाळकरी, भजनी मंडळी, नारायणगडचे विश्वस्त मंडळ, विविध पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार, मान्यवरांच्या दिंडी सोहळा गडावरून पंढरपूर कडे प्रस्थान करण्यात आले. नगद नारायण महाराज की जय, जय हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम आशा जयघोषात घाट डोंगर उतरत उतरत वारकरी वेशात घाट भक्तीने फुलून गेला होता. पुढे बेलुरा शिवारातील डोंगर माथ्यावर गावकऱ्यांनी दिंडीचे आगमन झाल्यानंतर स्वागत आणि पूजन करत सर्व वारकऱ्यांना नाष्ट्याची सोय करत दिंडी विसावते. ग्रामस्थांच्या वतीने मठाधिपती महंत गुरुवर्य शिवाजी महाराज यांचे स्वागत करुन बेलुरा येथील मुक्कामासाठी ही दिंडी जाते. या पायी दिंडी मार्गाचा पहिला मुक्काम बेलुरा गावात पडतो. रात्रीच्या वेळेस वारकऱ्यांना भोजन व्यवस्था करून दुसऱ्या दिवशी सकाळी तेवढ्यात उत्साहात गावातून दिंडी नवगण राजूरी, गजानन सहकारी साखर कारखाना मार्गे, शिरापुर धुमाळ, उकंडा, चर्हाटा जाधववाडी ते बेलखंडी पाटोदा येथील दि.१५ जूलै रोजी मुक्कामासाठी पुढे मार्गस्थ होते. यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात वाजत गाजत दिंडीचे स्वागत केले. यावेळी मठाधिपती महंत गुरुवर्य प्रेममुर्ती शिवाजी महाराज, हभप रंगनाथ महाराज सुळरेगांवकर, उत्तराधिकारी महंत हभप शांतीमुर्ती संभाजी महाराज, सिद्धेश्वर महाराज गाडे, लक्ष्मण महाराज तकीक, गवते महाराज, डोळस महाराज, बाळू देवा मुळे आर्वीकर, अंबादास महाराज बहिर, बागलाने महाराज, यावेळी विश्वस्त मंडळाचे सदस्य अँड. महादेव तुपे, शेळके सर, बळीराम गवते, सी ए जाधव ,गोवर्धन काशीद, युवानेते योगेश भैय्या क्षीरसागर, माजी जिल्हा परिषद सदस्य बप्पासाहेब तळेकर, नारायणगड चे भक्त उद्योजक गणेश नलवडे, प्रकाश कवठेकर, पत्रकार दिनेश गुळवे, पत्रकार बाळासाहेब घाडगे पत्रकार राहुल लोंढे, शिवव्याख्याते ज्ञानदेव काशिद, धनंजय जगताप, बंडूनाना काशिद, नवनाथ काशिद, भरत काशिद आदी मान्यवर उपस्थित होते.
आदींची उपस्थिती होती.
…….. चौकट
नगदनारायण महाराज यांच्या वंदनाने विठलांच्या भेटीस.., बळीराजा ला सुखी ठेव घातले साकडे…
आषाढी एकादशीच्या निमित्ताने नारायणगड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा विठ्ठल दर्शनासाठी मार्गस्थ होताना नारायणगडावरित सोहळा हजारो भक्तांच्या उपस्थितीत सजला होता. संत महंत,वारकरी, महिला, जेष्ठ नागरिक, यांच्या गर्दीनं गडा भक्तीत रममाण झाला. हाती झेंडा, डोईवर तुळस, मानकरी घोडे, भगवा ध्वज, हालगी, ठोल गजरात नगदनारायण महाराज यांना वंदन करून गडावरुन पंढरीच्या विठलांची वाट ही दिंडी भेटीसाठी चालायला लागली. त्याचबरोबर गडाचे मठाधिपती महंत गुरुवर्य शिवाजी महाराज भावनिक होत मनामध्ये दाटून लांबलेला पाऊसाने पेरणी खोळंबली आहे. यासाठी माझ्या बळीराजाला सुखी ठेव पाऊस पाणी चांगले पडू दे असे साकडे विठ्ठलाच्या चरणी मठाधिपती महंत शिवाजी महाराज यांनी घातले.



