📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

प्रा. मधुकर राळेभात यांच्या पुढाकाराने पायी दिंडीला उत्साही सुरुवात; १९ वर्षांची परंपरा जपली

प्रा. मधुकर राळेभात यांच्या पुढाकाराने पायी दिंडीला उत्साही सुरुवात; १९ वर्षांची परंपरा जपली

धाकटी पंढरी धनेगावकडे दिंडीचे मोठ्या उत्साहात प्रस्थान

जामखेड प्रतिनिधी –जामखेड शहरातून धनेगाव (धाकटी पंढरी) येथे आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या पायी दिंडीने आज श्रीकृष्ण मंदिर, मोरे वस्ती येथून भक्तिभावाने प्रस्थान केले. ही दिंडी गेल्या १९ वर्षांपासून हभप प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांच्या माध्यमातून अविरत सुरू असून, यंदाही शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात दिंडीने धाकटी पंढरी धनेगावकडे
प्रस्थान झाले.

सकाळी महाआरतीनंतर टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि भगव्या पताकांनी सजलेल्या मार्गावर वारकऱ्यांनी विठुनामाच्या जयघोषात पदयात्रा सुरू केली.

यावेळी हभप दादा (महाराज) ठाकरे, हभप बाळासाहेब गाडे( महाराज), आबासाहेब विर, सेवा निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे, नगरसेवक दिगांबर चव्हाण,मोहन पवार, जेष्ठ नेते सुरेश भोसले, प्रा. लक्ष्मण ढेपे, अॅड. महारूद्र नागरगोजे, संजय काशिद, प्रवीण चोरडिया, पवन राळेभात , अमित जाधव,रंगनाथ राळेभात, महावीर बाफना,
पिंटू बोरा, गुलाब जांबळे,अशोक बाफना, दादा रिटे, मोरे सर,संदीप राळेभात,ॲड अमृत राळेभात आदि मान्यवरांसह महिला व पुरुष वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

दिंडीचे शहरात ठिक- ठिकाणी पुष्पवृष्टी करुन स्वागत करण्यात आले. सदर दिंडीचे जगदाळेवस्ती, बटेवाडी येथे अल्पोपाहार तर राजुरी येथे भोजन, आणि पिंपळगाव येथे पहिला मुक्काम तसेच दुसऱ्या दिवशी दिंडी दौंडचीवाडी, सोनेगावमार्गे धनेगाव येथे पोहोचणार आहे.

ही दिंडी श्रद्धा, भक्ती आणि सेवा यांचे प्रतीक ठरली असून, वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक अध्यात्मिक प्रवासाला प्रा. मधुकर राळेभात यांनी दिलेली ही दिशा आजही भाविकांच्या मनामनात आदराने जपली जाते.

Back to top button