बीड
अॅड. संतोष घोलप यांच्या शक्तीशाली युक्तिवादामुळे 44 गुन्हे दाखल असलेल्या बाळराजे आवारेंची अखेर बीडमध्ये जामीन

अॅड. संतोष घोलप यांच्या शक्तीशाली युक्तिवादामुळे 44 गुन्हे दाखल असलेल्या बाळराजे आवारेंची अखेर बीडमध्ये जामीन
महाराष्ट्रातील बहुचर्चित पुतळे उभारणी प्रकरणात बाळराजे आवारे पाटील आहेत अटक!!
*बाळराजे आवारे पाटील यांचे माढा येथील देवेंद्र फडणवीस यांच्यावरील भाषण त्यांना भोवल्यामुळेच गुन्हे दाखल झाल्याची चर्चा!!
*भल्या भल्यांचे सहकार्य नाकारून एकाकी दिलेल्या लढ्याला शिवप्रेमी बाळराजे आवारे पाटील यांच्या संघर्षाचे यश दृष्टीक्षेपात!!
*शिवप्रेमी मराठा मावळा बाळराजे आवारे पाटील यांच्या जामीनसाठी मुस्लिम मावळा ऍड. खालेद पठाण यांचेही लाभले विशेष सहकार्य
बीड : प्रतिनिधी
माढा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट भाषण केले तसेच पोलिसांविरोधात आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी धर्मवीर संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांच्यावर कलम 189 (2), 190, 329 (3), 353 (3), 61 (2), भारतीय न्याय संहिता 11 याप्रमाणे महाराष्ट्रात तब्बल 44 गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी त्यांना एप्रिलमध्ये अटक करण्यात आली होती. आज आवरे यांच्या अटकेला तीन महिने होऊन गेली. दरम्यान दि. 1 जुलै रोजी बीड जिल्ह्याचे प्रसिद्ध विधीज्ञ अॅड. संतोष घोलप यांनी अत्यंत अभ्यासू आणि शक्तिशाली युक्तिवाद मांडून बाळराजे आवरे पाटील यांना जामीन मिळवून दिला. दरम्यान अॅड. संतोष घोलप यांचे ज्युनियर अॅड. खालेद पठाण या मुस्लिम मावळ्याने देखील मोठे सहकार्य केले. एकूणच बाळराजे आवारे पाटील यांच्या या जामीनकडे संपूर्ण महाराष्ट्राने लक्ष वेधले होते.
*प्रसिद्ध विधीज्ञ अॅड. संतोष घोलप यांचा अत्यंत अभ्यासू आणि शक्तिशाली युक्तिवाद
धर्मवीर संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर कलमान्वये एकूण 44 गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान मागील तीन महिन्यांपासून बाळराजे आवारे पाटील यांनी जामीनसाठी अत्यंत संघर्ष केला. परंतु बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध विधीज्ञ अॅड. संतोष घोलप यांनी अत्यंत अभ्यासू आणि शक्तिशाली युक्तिवाद मांडून आवरे यांना जामीन मिळवून दिला. युक्तिवाद करताना अॅड. संतोष घोलप म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला सरकारकडून टार्गेट केले जात असेल तर त्याच्याकडून होणारे सामाजिक कार्य सरकारवर परिणामकारक ठरू शकते म्हणून शासनाने त्यांच्या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग आहे किंवा नाही हे न पाहता एकाही गुन्ह्यामध्ये सदरील व्यक्ती त्या ठिकाणी प्रत्यक्ष आहेत किंवा नाहीत याची खात्री न करता जाणीवपूर्वक गुन्ह्यात अडकवले तसेच या आरोपीने कुठे कट रचला याचा कोणताही सबळ पुरावा नसताना कायदा पायदळी तोडून बेकायदेशीर रित्या अटक केलेली आहे. तसेच सर्व गुन्ह्यात इतर आरोपींना अटक न करता एकट्या बाळराजे आवारे यांना अटक झालेली आहे. तसेच गुन्हा दाखल करताना लावलेली कलमे लागू होत नाहीत, हा युक्तिवाद ऐकून जिल्हा न्यायालयाने बाळराजे आवारे पाटील यांचा जामीन काल मंजूर केला.
*अनेक ठिकाणी एकट्यावरच
गुन्हा दाखल व अटक!!
धर्मवीर संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांच्यावरच अनेक ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. एवढेच नव्हे तर दाखल गुन्ह्यांमुळे त्यांना अटक करण्यात आली. या संपूर्ण गुन्ह्यांमध्ये बाळराजे आवारे यांच्याबरोबर अनेक ठिकाणी सहकार्य बरोबर होते परंतु त्यांच्याबरोबर असलेल्या सह आरोपींना फक्त नोटीसद्वारे समज देऊन सोडण्यात आले. याचा सरळ सरळ अर्थ असा काढण्यात येवू लागला आहे की, जाणीवपूर्वक आवरे पाटील यांनाच अटक करण्यात आली. दरम्यान एप्रिल महिन्यामध्ये त्यांनाही अटक झाली होती. आज या घटनेला तीन महिने झाले आहेत. परंतु, सुदैवाने बीड येथील कोर्टामध्ये त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
*बाळराजे आवारे पाटील यांच्यावर
कोणते गंभीर गुन्हे दाखल आहेत?
सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना कट रचून व आर्थिक व्यवहार करून संबंधित कार्यालयाची व प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता महापुरुषांचा पुतळा बेकायदेशीररित्या बसवणे,
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसविण्याकरिता लोकांना चेतावणी देणे, दोन धर्मात व समाजात तेढ निर्माण करणे व सामाजिक शांतता व सलोखा भंग करणे अशा प्रकारे त्यांच्यावर कलम 189 (2), 190, 329 (3), 353 (3), 61 (2), भारतीय न्याय संहिता 11 याप्रमाणे महाराष्ट्रात तब्बल 44 गुन्हे दाखल करण्यात आले.
* कुठे कुठे गुन्हे दाखल झाले आणि
जामीन अद्याप कुठे शिल्लक आहे?
धर्मवीर संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांच्यावरच बार्शी, सोलापूर, माढा, केज, माजलगाव, धारूर, अंबाजोगाई, गेवराई, युसुफ वडगाव, वडवणी, परंडा, भूम, अंबड, येरमाळा, कळंब आणि धाराशिव अशा 16 ठिकाणी एकूण 44 गुन्हे दाखल आहेत. तसेच माढा, गेवराई आणि माजलगाव या ठिकाणी बाळराजे आवारे पाटील यांना जामीन मिळणे अद्याप शिल्लक आहे.



