राजकीय उलथा पालथ.. म्हसळा भाजपला खिंडार …म्हसळा भाजप तालुका अध्यक्षासह असंख्य पदाधिकारी शिवसेनेत..

राजकीय उलथा पालथ.. म्हसळा भाजपला खिंडार …म्हसळा भाजप तालुका अध्यक्षासह असंख्य पदाधिकारी शिवसेनेत..
म्हसळ्याचे राजकीय घडामोडी बदलणार
द. रा. जि. उपसंपादक:संतोष उध्दरकर.
म्हसळा :जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्व भुमिवर
श्रीवर्धन मतदार संघात राजकीय वातावरणात तापु लागल्याने म्हसळा तालुक्यात मोठी राजकीय घडामोडी होणार असल्याने शिवसेना म्हसळा प्रभारी तालुका प्रमुख बाबू बनकर यांच्या नेतृत्वाखाली म्हसळा तालुक्यातील भाजप म्हसळा तालुका अध्यक्ष महेश पाटील यांच्या सह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा शिवसेनेचे नेते, महाड मतदार संघातील कार्यसम्राट तसेच महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पक्ष प्रवेश करण्यात आला. तसेच ईंतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. या पक्षप्रवेशामध्ये
म्हसळा भाजप तालुका अध्यक्ष महेश पाटील, माजी भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर,शरद कांबळे, भाजप जेष्ठ नेते लहु तुरे, म्हसळा भाजप तालुका सरचिटणीस समीर धनसे, गोविंद भायदे, मनोहर जाधव, तालुका मोर्चा अध्यक्ष प्रशांत महाडिक, माजी उपसरपंच अकमल कादिरी,नदिम दफेदार, सुफियान दोंदिलकर,हानिफ जामदार,नदिम कादिरी,शमिल नजीर, आदींचा समावेश आहे. यावेळी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, संपर्क प्रमुख सचिन पाटेकर,शिवसेना नेते रविंद्र लाड, म्हसळा शिवसेना प्रभारी तालुका प्रमुख बाबु बनकर, युवा सेना माजी जिल्हा प्रमुख अमित महामुणकर, उपतालुका प्रमुख अक्रम साने, शिवसेना म्हसळा तालुका संपर्क प्रमुख अमोल पेंढारी, पाभरा विभाग प्रमुख जयेश जाधव उपस्थित होते.
———————————–
मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या नेतृवाखाली म्हसळा तालुक्यातील भाजपचे तसेच इतर पक्षातील असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आमची राजकीय ताकद वाढल्याने म्हसळा पंचायत समितीवर यावेळी भगवा फडकवणार असा आम्हाला ठाम विश्वास आहे.
प्रविण ( बाबु ) बनकर
म्हसळा प्रभारी तालुका प्रमुख



