क्राईमबीडब्रेकिंग

वाळू माफीयांची मुजोरी : चक्क तहसीलदारांच्या निवासस्थाना समोर उभ्या केलेल्या टिप्पर मधील वाळू काढली !

केज तहसील कार्यालयातून जप्त केलेल्या टिप्पर मधील वाळू काढून ती कमी वाळू दाखविण्याचा प्रयत्न !

पोलीसांत गुन्हा दाखल होण्याची शक्यता !

केज / प्रतिनिधी

केजच्या महसूल पथकाने कार्यवाही करून तहसील आवारातील तहसीलदारांच्या निवासस्थाना समोर उभ्या असलेल्या वाळूच्या टिप्पर मधील वाळू काढून ती कमी असल्याचा दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता हे प्रकरण चांगलेच अंगलट येण्याची शक्यता असून पथक प्रमुख यांच्या अहवाला नुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.

या विषयी माहिती अशी की, मागील महिन्यात दि .२६ एप्रिल सोमवार रोजी सायंकाळी ७:०० वा. च्या सुमारास केज तहसील कार्यालयाच्या भरारी पथकातील मंडळ अधिकारी भागवत पवार आणि तलाठी लहु केदार यांनी केज-अंबाजोगाई महामार्गावरून गंगेची वाळू घेऊन जाणारा हायवा टिपर क्र.(एम एच-४४/यू-१३१०) दृष्टीस पडला होता. टिप्पर अडवून संबंधित गंगेच्या वाळू संबंधी चौकशी केली असता संशय वाटू लागला; म्हणून मंडळ अधिकारी भागवत पवार व लहू केदार यांनी ते टिप्पर तहसील कार्यालयात आणले. त्या मधील वाळुचे प्रत्यक्ष मोजमाप केल्या नंतर त्यात ५.७३ घन मीटर एवढी म्हणचे मर्यादे पेक्षा जास्त वाळूची वाहतूक केल्याचे सिद्ध झाले होते. म्हणून त्याच्या मालकाकडून ४ लाख १८ हजार ६४२ रु. चा दंड मंडळ अधिकारी भागवत पवार आणि तलाठी लहु केदार यांच्या भरारी पथकाने ठोठावला.


मात्र त्या नंतर वाळू माफियांनी शक्कल लढवून दि. १ जून रोजी रात्री चक्क तहसीलच्या आवारात व तहसीलदारांच्या निवास स्थानासमोर उभ्या असलेल्या टिप्पर मधील वाळू रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन खाली काढून टाकली व पुन्हा त्यातील वाळू मोजण्याची मागणी केली. दि. २ जून रोजी हा प्रकार अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच पथक प्रमुख भागवत पवार यांनी महसूल कर्मचारी नागरगोजे, कुमठेकर व पटाईत यांनी या गैरप्रकाराचा अहवाल प्रभारी तहसीलदार धस यांना सादर केला आहे. अद्याप या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल झाला नाही. तपास अहवाला नंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.०.५५ घनमीटर वाळू खाली काढून टाकली ! :- ज्या वेळी टिप्पर ताब्यात घेऊन त्यातील वाळूचे मोजमाप घेतले त्यावेळी त्यात ५७३ घ.मी. वाळू होती. त्यातील वाळू काढल्या नंतर त्यात ५.१८ घ.मी. एवढी वाळू होती म्हणजेच ०.५५ घ.मी. एवढी वाळू खाली काढून टाकली. टिप्पर शेजारी ती काढून टाकलेली वाळू स्पष्ट दिसून येत आहे.


तहसिलच्या कर्मचाऱ्यांचा हात असल्याची चर्चा ! :- या प्रकरणी तहासिलच्या कर्मचाऱ्यांचा हात असल्याची चर्चा सुरू असून तहसीलच्या आवारातील व तेही चक्क तहसीलदारांच्या निवासस्था समोर उभ्या असलेल्या टिप्पर मधील वाळू काढण्याची हिम्मत झाली नसती.

Back to top button