कोरोना अपडेटमहाराष्ट्रसंपादकीय

कोरोणामुळे टाळ, विणा, पखवादाचा निनाद थांबला


प्रतिनिधी ! नंदकुमार मोरे

गतवर्षीपासुन कोरोणा संसर्ग आजाराने ग्रामीण भागासह शहरी भागात सुध्दा थैमान घातल्याने त्या प्राश्वभुमीवर शासनाने लागु केलेल्या संचारबंदीमुळे धार्मीक , सामाजीक , राजकीय , कार्यक्रम बंद आहेत यामध्ये किर्तन , प्रवचन , अखंड हरिनाम सप्ताह , हरिपाठ , इतर धार्मीक कार्यक्रम बंद आहेत त्यामुळे टाळ , विणा , पखवादाचा निनाद थांबला आहे वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन महाशिवरात्री पासुन अनेक गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाची अनेक वर्षांची परंपरा आहे परंतु गतवर्षीपासुन कोरोणा संसर्ग आजाराने थैमान घातल्यामुळे तो आजार रोखण्यासाठी शासनाच्या वतीने धार्मीक कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत एकादशीनिमीत्त चालणारे गावोगावी सामुहीक भजन ,किर्तन , प्रवचन तसेच दररोज सायंकाळी गावातील मंदीरामध्ये सामुहीक हरिपाठ उपासना चालत असतात याला टाळ , विणा , पखवादाची साथ असते मात्र कोरोणा संसर्गाच्या भितीने लागु असलेल्या संचारबंदीमुळे हा निनाद थांबला आहे .

मार्च महीण्यापासुन अखंड हरिनाम सप्ताह , यात्रा ,मेळावे , उत्सव , मोठ्या प्रमाणात चालु होतात या काळात अनेक गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाची संख्या मोठ्या प्रमाणात असते. किर्तनकार ,पखवादक , विनेकरी , चोपदार , टाळकरी , प्रवचनकारही या दिवसात व्यस्त असतात परंतु गतवर्षीपासुन कोरोणामुळे संचारबंदी तर कधी लाँकडाऊन चालुच आहे यामुळे सर्व सामुहीक , धार्मीक , सांस्कुतीक , कार्यक्रम रद्द झाले आहेत लोकाची गर्दी टाळण्यासाठी किर्तनकार ,प्रवचनकार कुठेही जात नाहीत एप्रिल मे महीण्यात हरिनाम सप्ताहांत काकडा आरती , गाथा पारायण , भजन किर्तन , प्रवचन , तसेच गावात स्नेहभोजन आदीसह दिनक्रम चालु असतात गावोगावी प्रत्येक एकादशीला रात्री संप्रदाय पंथाचे सामुहीक भजन तर दुस-या दिवशी द्वादशीला स्नेहभोजन , दररोज मंदीरामध्ये सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान सामुहीक हरिपाठ होत असतो त्यामुळे मंदीर परिसरात आनंदमय व भक्तिमय वातावरण निर्माण होते

चैत्र महीण्यात ब-याच ठिकाणी यात्रा भरविण्यात येत असते तसेच रामनवमीचा कार्यक्रम सुध्दा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत होता पण कोरोणाच्या भितीने व चालु असलेल्या संचारबंदीमुळे सर्व धार्मीक ,सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत काही ठिकाणी सप्ताहाची परंपरा स्थगित होऊ नये यासाठी तुकाराम गाथा पारायण , ग्रथंराज न्यानेश्वरी पारायण एकाच व्यक्तीने मंदीरामध्ये बसून त्याच तिथीवर सुरु आसल्याचेही दिसुन येत आहे.

Back to top button