जळगावब्रेकिंगमहाराष्ट्र

जलसंपदा विभागात जम्बो निवृत्तीनंतर रिक्त पदे भरा

जलसंपदा विभागात जम्बो निवृत्तीनंतर रिक्त पदे भरा

प्रतिनिधी | जळगाव

जलसंपदा विभागात ३१ मे रोजी ७८६ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त झाले. दरवर्षी मे अखेर हजारो कर्मचारी अधिकारी निवृत्त होत असतात; मात्र ही पदे रिक्तच राहतात. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे रिक्त पदे भरण्यासाठी लगेच नवीन भरती करण्यात यावी, अशी मागणी राज्य स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

जलसंपदा विभागांतर्गत यंदा अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता, अभियांत्रिकी सहायक, स्थापत्य प्रथम लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वाहनचालक, कारकून, कालवा दप्तर निरीक्षक, मोजणीदार, कालवा चौकीदार, शिपाई, सीआरटी आदी संवर्गातील ७८६ अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झालेत; मात्र त्यांच्या जागेवर नवीन नियुक्ती होत नसल्यामुळे ताण वाढत आहे.

Back to top button