संपादकीय

लष्कराच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत बिपीन रावत यांच्यासह ९ बडे अधिकारी जखमी; नितीन गडकरींच ट्विट

 

नवी दिल्ली | तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत देखील उपस्थित होते. याशिवाय त्यांचे कुटुंबीयही हेलिकॉप्टरमध्ये होते.यानंतर बिपीन रावत या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले आहें.

तसेच बिपीन रावत यांच्यासह प्रवास करणारे ‘हे’ आहेत ९ बडे अधिकारी होते असे ट्विटमध्ये नितीन गडकरी यांनी म्हंटले आहे, सीओडीएस श्री बिपिन रावत यांच्यासोबत हेलिकॉप्टरच्या दुःखद अपघाताबद्दल ऐकून धक्का बसला आहे. मी प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी, कल्याणासाठी प्रार्थना करतो अशा आशयाचे ट्विट केले आहे.

तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे हे Mi- 17V5 हेलिकॉप्टर कोसळलं आहे. संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावतदेखील हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हवाई दलाने या माहितीला दुजोरा दिला आहे. हेलिकॉप्टरमधील प्रवाशांना वाचवण्याचे काम सुरू आहे. यामध्ये १४ जण प्रवास करतो होते, त्यापैकी ३ जणांना वाचवण्यात यश आले आहे. माहितीनुसार बिपिन रावत एका व्याख्यानमालेत सहभागी होणार होते. यानंतर बिपीन रावतांवर रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

Back to top button