संपादकीय

पंतप्रधान डिसेंबरअखेर पुणे दौऱ्यावर; मेट्रोचे भूमिपूजन मोडियांच्या हस्ते !

 

नवी दिल्ली | काही महिन्यात होणाऱ्या पुणे महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी डिसेंबरअखेर पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पुणे मेट्रोचे उद्घाटन आणि हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे भूमिपूजन ते करणार आहेत. यादृष्टीने प्रशासकीय तयारी करण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाकडून आल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्यातच महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र या माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. ओबीसी आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने यासंदर्भात स्पष्टता नसल्याचे सांगण्यात आले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडे तयार झाले आहेत.

या दोन्ही महापालिकांसह पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाही येत्या जानेवारी महिन्यात लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा होतो आहे. पुणे मेट्रोचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते झाले होते. आता वनाज ते गरवारे कॉलेज दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न आहे.

Back to top button