बीड

घोडेगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ; मुलांचे भविष्य उज्ज्वल – बाळासाहेब धनवे

घोडेगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ; मुलांचे भविष्य उज्ज्वल – बाळासाहेब धनवे

जामखेड प्रतिनिधी – जामखेड तालुक्यातील शैक्षणिक कार्यातून निर्माण झालेली घोडेगाव येथील लोकांची एकजूट आणि विश्वासाचे नाते व लोकसहभागातून उभारल्या जाणाऱ्या शाळा खोल्या हे मंदिराच्या कळसाहूनही मोठे कार्य आहे.गावातील मुलांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे ,असे गौरवोद्गार उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी काढले.
जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथे उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

जिजामाता विद्यालय येथील समिक्षा बाळासाहेब कांबळे या विद्यार्थिनीला दहावी परीक्षेत ८८% गुण मिळाल्याबद्दल तसेच शिक्षणप्रेमी महादेव भोंडवे यांचे सुपुत्र यश व हर्षद यांचा देखील फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यशने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केले असून हर्षदने दहावी परीक्षेत ९४% गुण मिळवले. त्यांच्या या उज्ज्वल यशामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, विकास मंडळाचे विश्वस्त मुकुंदराज सातपुते, गुरूमाऊली-सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष लेखक एकनाथ चव्हाण, जिल्हा संपर्कप्रमुख प्रताप पवार, आष्टी येथील शिक्षक पतसंस्थेचे अर्जुन गांगर्डे, दैनिक सुर्योदयचे उपसंपादक धनराज पवार, पालक महादेव भोंडवे, बाळासाहेब कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामपंचायत घोडेगावचे सरपंच शरद जगताप, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब कांबळे व शिक्षणप्रेमी महादेव भोंडवे यांनी खरोखरच शैक्षणिक प्रगती पथाकडे वाटचाल सुरू केली आहे.

Back to top button