बीड
गोहत्या केल्यास मकोका लावणार हा कायदा जनतेसाठी राहणार का? सरेआम मटनाची निर्यात करणा-या बीफ कंपन्याला पण लागू राहणार – ॲड. इलियास इनामदार

गोहत्या केल्यास मकोका लावणार हा कायदा जनतेसाठी राहणार का? सरेआम मटनाची निर्यात करणा-या बीफ कंपन्याला पण लागू राहणार – ॲड. इलियास इनामदार
बीड प्रतिनिधि: काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला की गोहत्या करणा-यावर मकोका लावणार परंतु हा कायदा फक्त जनतेसाठी आहे का भाजपाचे व्यापारीमित्र बीफ कंपन्यांना पण लागू राहणार हे शासनाने जाहिर करावे अशी मागणी लोक सेना संघटना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने केली आहे. या कायदयाद्वारे गोहत्या थांबवायची असेल तर फक्त गरीब खाटकावर कार्यवाही करून कसे चालणार, गाई बैल विकणा-या व्यापा-यांवर पण कार्यवाही व्हायला पाहिजे गाई बैल पकडून देणारे व नंतर मांडवली करून हफते खाणा-या डुपलीकेट गोरक्षकांवर पण मकोका लावायला हवे, छावन्या मधून जनावरे गायब करून विकणा-यावर किंवा छावन्याध्ये गाईंचे हाल हाल करून उपाशी पोटी मारणा-यांवर पण मकोका लावावा व राज्यात नव्हे संपूर्ण देशात गोहत्या करून विदेशात मटन निर्यात करणा-या बीफ कंपन्यांवर पण सुद्धा मकोका लावून कायदेशीर कार्यवाही करावी. का देशात व राज्यात असे कायदे करून भाजपाचा फक्त हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करन्याचा डाव तर नाही ना?
हिंदू धर्मामध्ये गाईला पवित्र मानले जाते गाई हिंदू बांधवांच्या आस्थेचा प्रश्न आहे राज्य शासनाने राज्यात नव्हे केंद्र शासनाने देशामध्ये गोहत्या बंदी कायदा करावा व गाईला राष्ट्रीय पशु घोषित करावे जेणे करून कोणी गोहत्या करू शकणार नाही अशी मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोक सेना संघटनेने ऑक्टोबर 2024 ला व मार्च 2025 ला निवेदनाद्वारे मागणी केली होती परंतु आज तारखेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी याविषयी कसलीच हालचाल केलेली दिसत नाही. गोरगरीबांसाठी कायदे करणा-या भाजपा सरकार चा हेतू फक्त देशात हिंदू मुस्लिम वाद निर्माण करन्याचा दिसत आहे बाकी काहीही नाही. लोक सेना संघटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या विषयी पुन्हा निवेदन पाठवणार आहे अशी माहिती लोक सेना संघटना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.



