बीड

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्रामीण युवकांसाठी प्रशिक्षणाची ‘गुढी’; विजेता करिअर अकॅडमीचा प्रारंभ!

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्रामीण युवकांसाठी प्रशिक्षणाची ‘गुढी’; विजेता करिअर अकॅडमीचा प्रारंभ!

बीड प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील युवकांना पोलीस आणि सैन्य दलात भरती होण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी, यशवंती आधार सामाजिक संस्था पुणे संचलित ‘विजेता करिअर अकॅडमी’चा शुभारंभ सोहळा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उत्साहात संपन्न झाला. माजलगाव-परभणी रोडवरील खरात आडगाव फाटा येथे हा सोहळा पार पडला.या कार्यक्रमाचे उद्घाटन विशाल दादा देवकते यांच्या हस्ते करण्यात आले. याच प्रसंगी खरात आडगाव चे नवनिर्वाचित पोलीस पाटील सुरज महादेव आढाव यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आबासाहेब वगरे सर, खरात आडगावचे सरपंच दत्ता आढाव, भैय्यासाहेब चोरमले, आदर्श पत्रकार संतोष रासवे, व्याख्याते गोविंद गोचडे सर, राठोड सर, प्रदिप घायतीडक, दत्तात्रय कोल्हे आणि उद्धव कुडकर यां सह अनेक मान्यवर उपस्थित होते.अकॅडमीचे संचालक डॉ. राजेश दिवटे यांनी आपल्या प्रास्ताविकात अकॅडमी स्थापने मागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “ग्रामीण भागातील गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही अकॅडमी ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालवली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या फीस मध्ये दर्जेदार पोलीस आणि सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण देणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.”उद्घाटक विशाल दादा देवकते यांनी आपल्या मनोगतात डॉ. दिवटे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, “डॉ. राजेश दिवटे यांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे. या अकॅडमीतून भविष्यात अनेक तरुण पोलीस आणि सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करतील, असा मला विश्वास आहे.”
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. राजेश दिवटे यांनी उपस्थित पाहुण्यांचे आणि ग्रामस्थांचे आभार मानले. या सोहळ्याला खरात आडगाव परिसरातील मोठ्या संख्येने युवक आणि नागरिक उपस्थित होते.
Back to top button