संपादकीय

त्वरितादेवी डोंगरांवर वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

तलवाडा प्रतिनिधी

तलवाडा याठिकाणी पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम दिनांक 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विस्तार अधिकारी चव्हाण, सरपंच सौ. मीनाताई विष्णुपंत हत्ते ,व उपसरपंच अज्जुशेठ सौदागर, यांच्या उपस्थितीत तलवाडा ग्रामपंचायत च्या वतीने त्वरिता देवीच्या डोंगरावरती वृक्षरोपण कार्यक्रम शनिवारी करण्यात आला.

पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी शासन स्तरावर झाडे लावा,झाडे जगवा हा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून ‘एक व्यक्ती तीन झाड’ असा अभिनव उपक्रम मुख्याधिकारी यांनी राबण्याचे ठरवल्या प्रमाणे जिल्ह्यात सर्व स्तरावर झाडे लावण्यात येत आहेत,तलवाडा या ठिकाणी ग्रामपंचायत च्या वतीने त्वरितादेवी डोंगर परिसर याठिकाणी झाडे लावण्यात आले त्याच बरोबर ग्रामपंचायत च्या समोरील आवारात ही झाडे लावण्यात येणार असून याची संगोपनासाठी सरपंच पती विष्णू तात्या हात्ते व उपसरपंच आक्रम सौदागर यांनी पुढाकार घेतला असून झाडे जोपासण्याचा संकल्प केला आहे, डोंगर परिसरात चिंच,वड ,लिंब ,गुलमोहर,रबरी वड,यासह विविध जातीचे झाडे लावण्यात आले.

यावेळी पंचायत चे विस्तार अधिकारी चव्हाण ए डी, सरपंच विष्णु तात्या हात्ते,उपसरपंच आक्रम सौदागर,ग्रामपंचायत सदस्य किशोर हात्ते,लहू जाधव, नारायण मरकड,निखिल करडे,चंदू मस्के,गणेश कचरे,वरिष्ठ सहाय्यक गिरी,बाबासाहेब आठवले,साहेबराव कुऱ्हाडे,पत्रकार बापू गाडेकर,अशोक सुरासे,तलवाडा सज्जाचे तलाठी,कर्मचारी तुळशीराम वाघमारे,अरुण डोंगरे,गौतम आठवले,अरुण आठवले,दत्ता मोरे,गणेश हातागळे,मसू अडगळे,किसन रोकडे,विष्णू डोंगरे,यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button