📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मा.आ.लक्ष्मण पवार व शिवराज पवारांच्या वतिने आयोजित इफ्तार पार्टीस उत्स्फूर्त प्रतिसाद 

मा.आ.लक्ष्मण पवार व शिवराज पवारांच्या वतिने आयोजित इफ्तार पार्टीस उत्स्फूर्त प्रतिसाद
गेवराई दि. 24  (प्रतिनिधी):-  भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या वतीने  सोमवार ता. 24 रोजी आयोजित करण्यात आलेल्या रोजा इफ्तार पार्टीस मुस्लिम बांधवांनी उपस्थिती दर्शवून मोठा प्रतिसाद दिला. यावेळी युवा नेते शिवराज दादा पवार यांनी आलेल्या मुस्लिम बांधवांचे स्वागत केले.
    गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल सभागृहात भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या
वतीने प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी  रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. युवा नेते शिवराज पवार यांनी आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांचे स्वागत केले. पवित्र रमजान महिण्यानिमित्त मुस्लिम बांधव दिवसभर उपवास पाळतात.  सायंकाळी उपवास सोडण्यात येतो.  भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते. सोमवार ता. 24 रोजी आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीस गेवराई शहरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली यावेळी शहरातील मुस्लिम बांधवासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बांधव तसेच पदाधिकाऱी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Back to top button