बीड
आदित्य शिक्षण संस्थेमध्ये ‘एचपीव्ही’ विषाणू अन् गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती योग्य वयातील लसीकरण आणि नियमित तपासणी हाच कर्करोगावर प्रभावी उपाय

आदित्य शिक्षण संस्थेमध्ये ‘एचपीव्ही’ विषाणू अन् गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती
योग्य वयातील लसीकरण आणि नियमित तपासणी हाच कर्करोगावर प्रभावी उपाय
प्रतिनिधी | बीड
आदित्य डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल, बीड येथे एचपीव्ही विषाणू आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग या गंभीर आरोग्यविषयक विषयावर भव्य जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थी, पालक आणि समाजामध्ये एचपीव्ही संसर्ग, त्यापासून उद्भवणारे आजार, प्रतिबंधात्मक उपाय तसेच लसीकरणाबाबत योग्य माहिती पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
आदित्य शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या उच्च शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य देतानाच त्यांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष दिले जाते. संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा आणि संचालिका डॉ. आदिती सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली याच भावनेतून ‘एचपीव्ही’ विषाणू आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत या विशेष जनजागृती उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमादरम्यान मुख्य मार्गदर्शक व तज्ज्ञ डॉ. अनुराग पांगरीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “एचपीव्ही हा अत्यंत सामान्य विषाणू असून, बहुतांश संसर्ग शरीराची प्रतिकारशक्ती स्वतःहून नियंत्रित करते. मात्र, काही उच्च-जोखमीच्या प्रकारचा संसर्ग शरीरात दीर्घकाळ टिकून राहिल्यास गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा किंवा कर्करोगपूर्व बदलांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो.”
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचा दाखला देत त्यांनी स्पष्ट केले की, “किशोरवयीन मुलींमध्ये योग्य वयात केलेले एचपीव्ही लसीकरण हा कर्करोगापासून संरक्षण मिळवण्याचा सर्वात प्रभावी आणि सुरक्षित उपाय आहे. यासोबतच नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. कार्यक्रमाची सांगता “एचपीव्हीपासून संरक्षण – लसीकरण, तपासणी आणि जनजागृती” या संदेशाने झाली. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे डॉ. हिमांशु श्रीवास्तव, संबंधित विभागप्रमुख, शिक्षकवृंद, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
—
प्रश्नोत्तर सत्रातून दूर झाले गैरसमज
समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी विशेष प्रश्न-उत्तर सत्राचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांनी व विद्यार्थ्यांनी लसीकरणाचे फायदे, योग्य वय आणि सुरक्षिततेबाबत विविध शंका विचारल्या. डॉ. पांगरीकर यांनी सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देऊन निरसन केले. आरोग्यविषयक अचूक माहिती समाजापर्यंत पोहोचवण्यात दंतवैद्यकीय विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे या वेळी सांगण्यात आले.