बीड
दुष्काळ सह शेती प्रश्नावर शेतकरी कामगार पक्षाचा केज तहसीलवर 21 सप्टेंबर रोजी बैलगाडी मोर्चा

दुष्काळ सह शेती प्रश्नावर शेतकरी कामगार पक्षाचा केज तहसीलवर 21 सप्टेंबर रोजी बैलगाडी मोर्चा
*50 हजार हैक्टरी मदत करून, 2025 चा पिक विमा द्या – भाई मोहन गुंड यांची मागणी*
केज ( प्रतिनिधी)
बीडसह मराठवाड्यात पावसाने पूर्णपणे हुलकावणी दिल्याने हाताला आलेले पीक करपून गेले आहे. खत, बी-बियाणे चढ्या भावाने खरेदी करूनही खर्च निघण्याची चिन्हे नाहीत. 2025 च्या खरीप-रब्बीचा पीक विमा आजपर्यंत मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची भीती असून शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने *सोमवार दि. 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता केज तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा* काढण्यात येणार असल्याची माहिती शेकापचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई मोहन गुंड (पाटील) यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे, हा मोर्चा गांधी चौक, डॉ. आंबेडकर चौक, मंगळवार पेठ मार्गी केज तहसील कार्यालयावर धडकणार आहे. याबाबतचे निवेदन केजचे तहसीलदार यांना देण्यात आले. 1) दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची तात्काळ मदत द्यावी. 2) जनावरांसाठी तात्काळ चारा छावण्या सुरू कराव्यात. 3) सन 2025 चा खरीप व रब्बी हंगामाचा प्रलंबित पीक विमा तात्काळ वाटप करावा. 4) शेती पंपाचे व घरगुती वीज बिल संपूर्ण माफ करावे. 5) शेती पंपासाठी किमान 8 तास अखंड वीज पुरवठा द्यावा. 6) स्मार्ट मीटर सक्तीने बसवणे तात्काळ बंद करावे 7) केज शहरालगतच्या शेतकऱ्यांना ग्रामीण कृषी योजनांचा लाभ द्यावा. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी बैलगाड्या सह सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई मोहन गुंड, भाई अशोक रोडे, रामलिंग पाटील ,मंगेश देशमुख, बाबाराजे गायकवाड, शाम चिंचोलीकर, दिगांबर मगर, महेश गायकवाड, दिनकर आण्णा भोसले, अनिल गलांडे, अण्णा नखाते, किशोर सुरवसे संतोष भोसले ,हनुमंत चाळक अंगद ससाने आदींनी केले आहे.



