📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

गोदावरी नदीपात्र कोरडेठाक; पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर!

गोदावरी नदीपात्र कोरडेठाक; पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर!
नदीपात्रात पाणी सोडण्याची शेतकरी व ग्रामस्थांची अमरसिंह पंडित यांच्याकडे मागणी
गेवराई ( प्रतिनिधी) : कमी पर्जन्यमानामुळे परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, सुरळेगावपासून नागझरीपर्यंत गोदावरी नदीपात्रात पाण्याचा थेंबही नसल्याने परिसरातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर आज मौजे नागझरी, खामगाव, सावळेश्वर, म्हाळस पिंपळगाव, राक्षसभुवन, पांचाळेश्वर, शहागड, गोरी, डोमलगाव आदी गावांतील शेतकरी व ग्रामस्थांनी राक्षसभुवन फाटा येथे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांची भेट घेऊन गोदावरी नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली.
यावेळी ग्रामस्थांच्या पाणीटंचाईच्या समस्येची दखल घेत अमरसिंह पंडित यांनी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यासंदर्भात गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, नदीपात्र कोरडे पडल्याने शेती, पशुधन आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शेतकरी व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
यावेळी जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांच्यासह सरपंच, चेअरमन, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button