मुंबई

भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून, गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं

 

मुंबई | राज्यात अगदीच सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीय महाविकास आघाडी सरकार नि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून, गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं, असं म्हणत आज पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला आहे.

नारायण राणे बोलताना म्हणाले की, भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून, गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं. जगाच्या पाठीवर असा मुख्यमंत्री झाला नाही. आज ढिंढवडे निघतायत. काय बोलताय, काय करताय? मुख्यमंत्री बारामतीला गेले. त्यावेळी शेतकरी प्रश्न, एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन त्यावर बोलावं. काहीच बोलले नाही. नुसती टिंगल टवाळी.” अशी टीका त्यांनी केली होती.

“मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, शरद पवारांसारखा लाचारपणा आमच्या रक्तात नाही. त्यानंतर त्याच शरद पवारांकडे लाचार होऊन जाऊन मुख्यमंत्री पद स्विकारलं. त्यानंतर शरद पवारचं आपले सर्वकाही आहेत. त्यांच्यामुळेच आपल्याला मुख्यमंत्री पद मिळालं, असं उद्धव ठाकरे सांगतायत असं म्हणत महाविकास आघाडी स्थापनेपूर्वी उद्धव यांनी पवारांवर केलेल्या वक्तव्याची नारायण राणेंनी आवर्जुन आठवण करुन दिली आहे.

Back to top button