संपादकीय

राजकीय नेत्यांवर टीका करताना विक्रम गोखले यांचा तोल सुटला

 

कंगनाच्या स्वातंत्र्यासंदर्भातील विधानाचे समर्थन केल्यापासून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर राजकीय स्थरांतून आणि सोशल मीडियातून बरीच टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत आपले म्हणणे मांडले. मात्र, यावेळी राजकीय पक्ष आणि नेत्यांवर भाष्य करताना त्यांचा तोल सुटला आणि त्यांनी राजकीय नेत्यांची तुलना कुत्र्यांशी केली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

“संपूर्ण राजकीय आयुष्य घालवलेली माणसं, कोणी तरी एक वेगळा माणून, वेगळा पक्ष काही तरी करतो म्हटल्यानंतर, देशासाठी, पक्षासाठी नाही. देशासाठी कुणी तरी काही तरी करतोय म्हटल्यानंतर, तो लोकप्रीय होणार, मग आमचं काय वाटोळं होईल? या भीतीने सगळे एकत्र येतात आणि भुंकायला सुरुवात करतात, असे हे सगळे आहेत. ही माझी शंका नाही, ही माझी खात्री आहे.” असे वक्तव्य जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केले आहे.

यावेळी गोखले म्हणाले, हे असे टोळक्यात राहणारे गावठी कुत्रे असतातना, त्यांच्या प्रमाणे हे भुंकने सुरूच असते. जे आपण रोज पाहतो आणि ते तुम्ही लोक सारखे चालवत असतात. मला दया येते तुमची, कीव करावीशी वाटते. त्रास होतो. जर्नालिझमचे शिक्षण घेतलेल्यांना काय भोगावे लागत असेल. खात्रीने सांगतो, तुमच्या पैकी कुणीही स्वतःच्या मनाने हे करत नाही.

पुढे बोलताना गोखले म्हणाले की, सारखं दाखवत राहणं. तुम्हाला रेशनिंगला दर महिन्याला पैसे हवे असतात. ते पुरवणारे चैनल विशिष्ट राजकीय पक्ष अथवा व्यक्तीला वाहिलेले असते. तो राजकीय पक्ष ज्या प्रमाणे सूचना देईल, त्या प्रमाणे मालक, तुमच्या कडून काम करून घेत असतो. त्यात तुमचा दोष नाही. तुम्हालाही पोट आहे. मी समजू शकतो. मला वाईट वाटते.

Back to top button