📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
संपादकीय

‘दारूत सर्वाधिक प्रामाणिकपणा’; अधिकाऱ्याचा अजब दावा

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लसीकरण मोहीम राबवली जात असून लसीकरण पूर्ण करण्यात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. त्यातच लसीकरांसाठी वेगवेगळ्या आकर्षक ऑफर्स नागरिकांना दिल्या जात आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अधिकाऱ्याने अजब दावा केला आहे.

मध्य प्रदेशच्या एका उत्पादन शुल्क अधिकाऱ्याने दारूसंदर्भात अजब दावा केला आहे. ‘दारूमध्ये सर्वाधिक प्रामाणिकपणा आहे’. असा दावा उत्पादन शुल्क अधिकाऱ्याने केला आहे. खंडवा जिल्ह्यातील कोणत्याही दुकानात कोविड-19 विरोधी लसीचे दोन्ही डोस लागू केल्याशिवाय दारूची विक्री केली जाणार नाही. अशा सूचना स्थानिक दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.

दारू खरेदी करण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीला कोविड लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल का? हा प्रश्न विचारल्यावर अधिकाऱ्यांचं विचित्र उत्तर ऐकायला मिळालं. अधिकाऱ्यांच्या मते, प्रमाणपत्र दाखवावं लागणार नाही. केवळ त्याला तोंडी माहिती द्यावी लागणार आहे. दारूच्या दुकानातील सेल्समन दारू विकत घेणाऱ्याला लसीकरणाबद्दल माहिती विचारेल. त्यावर ग्राहकाने हो म्हटले तर त्याला दारू विकली जाईल. ज्याने दोन्ही डोस घेतले आहेत त्यालाच मद्य दिलं जाईल.

Back to top button