मुंबई

प्रभाकर साईल यांच्या आरोपांवर संदीप वानखेडे म्हणतात की,

 

ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदारांपैकी एक फरार केपी गोसावीच्या अंगरक्षाने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने त्यांना खोट्या पंचनाम्यावर सही करायला लावली होती, असा आरोप के.पी. गोसावीचा अंगरक्षक प्रभाकर साईल याने केला आहे.

के.पी.गोसावी हा क्रूझवरील छापेमारी प्रकरणातील ९ साक्षीदारांपैकी एक आहे. केपी गोसावीचा आर्यन खानसोबत सेल्फी व्हायरल झाल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्याने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा इंग्रजी वृत्तमाध्यमांशी बोलताना केला आहे. त्याच्या या आरोपांना समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

के.पी.गोसावीचा सहकारी प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे म्हणाले, ‘मी प्रभाकर साईल यांच्या आरोपांना योग्य उत्तर देईल.’ वेळ आल्यानंतर प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांना योग्य वेळ आल्यानंतर प्रत्युत्तर देईल, असे समीर वानखेडे यांनी म्हटले आहे. आता प्रभाकर साई यांच्या या आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

Back to top button