आरोग्य हीच खरी संपत्ती; विमा आवश्यक : नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी

आरोग्य हीच खरी संपत्ती; विमा आवश्यक : नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी
जामखेडमध्ये स्टार हेल्थ इन्शुरन्स कार्यालयाचे उद्घाटन व मोफत आरोग्य तपासणी शिबिर
जामखेड प्रतिनिधी :
सर्वसामान्य कुटुंबाला आजारपणात होणारा हॉस्पिटलचा खर्च परवडणारा नसतो. अशा वेळी आरोग्य विमा आर्थिक आधार देणारा ठरतो. स्टार हेल्थ इन्शुरन्स विमा कंपनी योजना वेळेत मदत करून सर्वसामान्य नागरिकांना विश्वास देण्याचे काम करत आहे. प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असून पुढील काळात नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी स्टार हेल्थ इन्शुरन्स विमा योजना कंपनी प्रभावीपणे पार पाडेल, असा विश्वास जामखेड नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी व्यक्त केला.
जामखेड येथे आज (दि. २२ जानेवारी २०२६) सकाळी ११ वाजता स्टार हेल्थ इन्शुरन्स, श्री संतोष डहाळे टीम जामखेड कार्यालयाचे उद्घाटन व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी जामखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी, स्टार हेल्थचे विभागीय अधिकारी विक्रांत कायगावकर,विभागीय व्यवस्थापक रणजित उजागरे, शाखा व्यवस्थापक (अहिल्यानगर) पूनम कंदूर, जामखेडचे विक्री व्यवस्थापक संतोष डहाळे, विमा सल्लागार नितीन मैड, संदीप भालेराव, विमा प्रतिनिधी गणेश खटावकर सर, अजय डांभे, इमरान पठाण, विजय गर्जे, लक्ष्मण खेत्रे, बाबासाहेब सोंडगे, नवनाथ पवार, कैलास जमदाडे, गणेश चव्हाण तसेच विमा प्रतिनिधी स्मिता संतोष डहाळे, प्रा. जयसिंग पवार, प्रा. विजय कोकाटे, शरद पवार, तुषार बोथरा आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना स्टार हेल्थचे पुणे विभागीय अधिकारी विक्रांत कायगावकर म्हणाले की, माणसाच्या जीवनासाठी अन्न, वस्त्र व निवाऱ्यासोबतच आरोग्य जपणे तितकेच महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य कुटुंबाला आजारपणात होणारा हॉस्पिटलचा खर्च पेलवणारा नसतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकासाठी आरोग्य विमा आवश्यक आहे. हप्त्यांमध्येही मेडिकल पॉलिसी घेण्याची सुविधा उपलब्ध असून सुमारे २० हजार कॅशलेस हॉस्पिटल्सची सेवा स्टार हेल्थ इन्शुरन्समार्फत दिली जाते. ही कंपनी भारतभर कार्यरत आहे.
या मोफत आरोग्य तपासणी शिबिरासाठी डॉ. विकास शिंदे, डॉ. सागर पाटील, डॉ. मनोज शिंदे, डॉ. सुनील हजारे तसेच परिचारिका रेश्मा शेख व परशुराम लटके यांनी विशेष सहकार्य केले. शिबिराचा लाभ सुमारे ८३ नागरिकांनी घेतला. कार्यक्रमाचे आभार विक्री व्यवस्थापक संतोष डहाळे यांनी मानले.



