महाराष्ट्र

“.नाहीतर 10 नोव्हेंबरपासून मंत्रालयाच्या दारातच संसार थाटू” गोपीचंद पडळकरांनी दिला इशारा

 

कोरोनाच्या अप्र्श्वभूमीवर मागच्या काही महिन्यापासून डबघाईला आलेल्या एसटी महामंडळाच्या कारभारामुळे तसेच एसटीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना वाढताना दिसून येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरून आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

मागील काही दिवसांत महाराष्ट्रातील ३१ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातील ३ कर्मचाऱ्यांचा जीव वाचला. २८ कर्मचाऱ्यांनी जीव गमावला तरी या ठाकरे सरकारचा आबोला सुटत नाही, असा घणाघात पडळकरांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुर्ण झाल्या नाहीत तर १० नोव्हेंबर रोजी मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही पडळकरांनी दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या दारात जाऊन त्यांचे अश्रु पुसणं तर सोडा पण मुख्यमंत्र्यांनी साधं दोन ओळींचं सांत्वनाचं पत्रही पाठवलं नाही म्हणत पडळकरांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. तर मराठी माणसाच्या भरावशावर राजकारण करायचे आणि संकटात असताना त्याला व त्याच्या कुटुंबीयांना उघड्यावर टाकायचे हाच यांचा मराठी बाणा, असा टोला पाडळकरांनी लगावला होता

Back to top button